‘लॉकडाऊन’च्या काळातही आऊटडोअर सीनची मेजवानी ! ‘या’ मालिकेनं लढवली शक्कल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सरकारनं आता टीव्ही मालिका आणि सिनेमाच्या शुटींगसाठी परवानगी दिली आहे. असं असलं तरी कोणालाही सार्वजनिक ठिकाणी शुटसाठी परवानगी नाही. अनेक मालिकेत आता घरातलेच सीन्स जास्त दिसण्याची शक्यता आहे. अशात प्रेक्षकांना वेगळा अनुभव देण्यासाठी झी मराठी वाहिनीवरील माझा होशील ना या मालिकेनं यावर एक तोडगा काढला आहे.

मालिकेतील सई आणि आदित्य यांची प्रेमकथा आता चांगली रंगत आहे. दोघांच्या भेटीच्या सीनसाठी शहराजवळच्या एका छान टेकडीवरील जागा निवडण्यात आली होती. इथंच एक छान सीन शुट झाला आहे. लॉकडाऊनमध्ये बाहेर जाऊन शुट करणं शक्य नव्हतं. परंतु प्रेक्षकांना वेगळा अनुभव देण्यासाठी मालिकेच्या टीमनं आधुनिक तत्रज्ञानाचा आधार घेतला. रात्रीच्या वेळचा आणि शहराजवळच्या टेकडीचा अनुभव घेत वेगळा सीन दाखवला जाणार आहे. रात्रीच्या वेळी शहराच्या चमचमणाऱ्या दिव्यांचा अनुभव चाहत्यांनाही खूप आवडेल यात शंका नाही.

आता लवकरच प्रेक्षकांना घरी बसूनच निसर्गाच्या सानिध्यात टेकडीवरून शहर पाहण्याचा अनुभव मिळणार आहे आणि सोबत सई-आदित्यची रंगत जाणारी प्रेमकथा. मालिकेतील हा भाग शनिवारी दि 18 जुलै रोजी रात्री 9 वाजता प्रसारीत होणार आहे. ही माहिती समोर आल्यानंतर आता प्रेक्षक देखील या भागासाठी उत्सुक झाले असतील हे मात्र नक्की.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like