होय, २५० पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला : अमित शहा 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  – भारताने पाकिस्तनाच्या बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये किती दहशतवादी ठार झाले याचा निश्चित आकडा समोर आला नसताना भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मात्र या बाबतचे मोठे विधान केले आहे. अमित शहा यांनी एअर स्ट्राइकमध्ये २५० पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा केला आहे. ते गुजरातमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.

उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी लष्कराने सर्जिकल स्ट्राइक केला. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तान सीमेवर दक्ष असल्याने सर्जिकल स्ट्राइक होणार नाही असे लोकांना वाटत होते परंतु नरेंद्र मोदी सरकारच्या निर्णयाने तेराव्या दिवशीच एअर स्ट्राइक केला. यामध्ये २५० पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला असे अमित शहा म्हणाले आहेत.

पाकिस्तानच्या अटकेत असणारे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची पाकिस्तानला ४८ तासात सुटका करावी लागली कारण त्यांच्यावर मोदी सरकारचा दबाब होता. एवढ्या लवकर सैनिकाची सुटका होण्याची हि जगातील पहिली घटना होती असे अमित शहा म्हणाले आहेत. सैन्यावर होणाऱ्या हल्ल्याचा बदला घेणाऱ्या देशात अमेरिका आणि इस्त्रायल नंतर भारत हा तिसरा देश आहे असे अमित शहा म्हणाले आहेत.

एअर स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उभे करून विरोधक पाकिस्तानला संधी उपलब्ध करून देत आहेत. विरोधकांच्या विधानामुळे पाकिस्तानच्या चेहऱ्यावर हास्य फुलते आहे. तुम्ही मोदी सरकारला आणि सैन्याला पाठिंबा देऊ शकत नसाल तर कमीत कमी शांत रहा असे अमित शहा यांनी विरोधकांना सुनावले आहे.

https://twitter.com/ani_digital/status/1102424674003283968