काश्मीरच्या मुद्यावरून पाकची ही अभिनेत्री मलाला युसूफजईवर ‘भडकली’, दिला ‘भूतकाळ’ न विसरण्याचा सल्‍ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कॅलिफोर्नियामध्ये एका इव्हेंटमध्ये Apple चा आयफोन 11 लॉन्च केल्यानंतर त्यांच्या अनोख्या डिझाइनवर सोशल मिडियामध्ये विविध प्रकारचे मीम्स आणि जोक्स शेअर केले जात आहे. पकिस्तानी सामाजिक कार्यकर्त्या मलाला यूसूफजई यांनी देखील या संबंधित एक विनोदी ट्विट केले आहे.

मलालाने आयफोनला असलेल्या ट्रिपल कॅमेराच्या डिझायनला साजेशा असलेल्या ड्रेसचा फोटो शेअर केला आहे, आणि कॅप्शन दिले की, काय योग आहे, की आयफोन 11 च्या लॉन्चिंगच्या दिवशी मी अशाच प्रकारच्या डिझाइनचा ड्रेस घातला होता. काही जणांनी मलालाचे त्या विनोदी वृत्तीचे कौतूक केले तर काहींनी तिच्या ट्विटमुळे तिच्यावर टीका केली. अनेक पाकिस्तानी यूजर्सने लिहिले की, मलालाला काश्मीरवर ट्विट करण्यासाठी वेळ नाही परंतू आयफोनवर विनोदी ट्विट करण्यासाठी वेळ आहे.

Mathira

पाकिस्तानी कलाकार मथिराने नोबल पुरस्काराने सन्मानित मलालावर टीका केली, मथिरा म्हणाली की, मलालाने आपल्या ड्रेसवर ट्विट करण्यापेक्षा प्रियांका चोपडा आणि काश्मीरवर ट्विट करावे. प्रियंकाने भारतीय वायूदलाचे कौतूक करताना ट्विट केले होते, त्यानंतर पाकिस्तानमधून तिच्यावर टीका करण्यात आली. अभिनेत्री आमीना हकने मात्र मलालाचे समर्थन केले, ती म्हणाली की, हे दुखद आहे की मथिरा मलालावर टीका करते आणि अनेक जण तिला साथ देतात.

त्यानंतर मथिराने मलालावर पुन्हा एकदा निशाणा साधला, लोकांना आपल्या प्लॅटफॉर्मचा वापर पाकिस्तानी कलाकार महविश ह्यात सारखा वापरला पाहिजे. त्याने बेधडक जगासमोर आपले मत मांडले. मलालाला काश्मीरसाठी उभे राहिले पाहिजे आणि त्यासाठी आवाज उठवला पाहिजे. ती देखील एक लहान मुलगी होती, तिने त्रास सहन केला, लोकप्रियतेमुळे तिने हे विसरता कामा नये. परंतू यावर मलालाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
Malala

जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर मलाला युसूफजईने एक ट्विट केले होते, त्यात ती म्हणली होती की, काश्मीरी लोक तेव्हा पासून त्रास सहन करत आहे जेव्हा मी लहान होते, माझे आई वडील लहान होते, माझे आजी आजोबा तरुण होते. मला वाटते की सात दशकांपासून सुरु असलेला हा काश्मीरचा प्रश्न शांतेत सोडवावा.