विंग कमांडर अभिनंदनला पकडणारा पाकिस्तानी कमांडो चकमकीत ठार, भारताचा ‘बदला’ पूर्ण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विंग कमांडर अभिनंदनला मारहाण करणारा पाक सैनिक भारतीय जवानांच्या गोळीबारात ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. सुभेदार अहमद खान असे अभिनंदनला मारहाण करणाऱ्या पाकिस्तानी कमांडोचे नाव आहे. तो पाकिस्तानी लष्कराच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपमध्ये कार्यरत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी 17 ऑगस्ट रोजी एलओसीवर लष्करासोबत झालेल्या चकमकीत अहमद खान ठार झाला आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यास तो मदत करीत होता. दहशतवाद्यांना नौशेरा, सुंदरबनी आणि पल्लनवा सेक्टरमध्ये पाठवताना पाककडून समोरील भारतीय चौक्यांवर उखळी तोफांचा मारा केला जात होता. याला प्रतिकार करताना भारतीय जवानांनी केलेल्या गोळीबारात खानचा मृत्यू झाला आहे.

एअर स्ट्राइकच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तानच्या लढाऊ विमानांमध्ये चकमक उडाली होती. पाकिस्तानच्या एफ-16 लढाऊ विमानाचा पाठलाग करताना अभिनंदन वर्धमान यांचं मिग-21 विमान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. विमानाला आग लागल्याने अभिनंदन यांनी पॅराशूटने बाहेर उडी मारली आणि ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले. नंतर त्यांना पकडण्यात आले. त्यावेळी त्याला एका पाकिस्तानी कमांडोने मारहाणही केली होती. विंग कमांडर अभिनंदन यांची काही काळाने सुटका झाली होती. अभिनंदन यांच्या या धाडसी कार्याची दखल घेऊनच सरकारने त्यांना वीरचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like