पाकिस्तानची ‘दिवाळ’खोरी ! विमान वाहतूक कंपनी PIA नं 1000 कर्मचाऱ्यांना दिला ‘डच्चू’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानने द्वेषापोटी आणि उथळपणे अनेक चुकीचे निर्णय घेत स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असून देशातील प्रशासन चालवणेही त्यांना जड झाले आहे. भारताविरोधात व्यापार थांबवण्याचा आणि राजनैतिक संबंध तोडून टाकण्याचा निर्णय आणि आंतरराष्ट्रीय मंदी यांमुळे त्यांची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. याचाच परिणाम म्हणून पाकिस्तानच्या इंटरनॅशनल एअरलाइन्सने सुमारे एक हजार कर्मचार्‍यांना काढून टाकले आहे.

पाकिस्तानच्या वृत्तपत्र डॉनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान एअरलाइन्स (PIA) सध्या आर्थिक संकटाचा सामना करीत आहे, त्यामुळे खर्च कमी करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. पीआयएचे अध्यक्ष एअर मार्शल अरशद मलिक यांनी अर्थमंत्री सल्लागार अब्दुल हफीज शेख यांच्याशी झालेल्या बैठकीत त्यांनी या निर्णयाची पुष्टी केली.

व्यवस्थापन खर्च कमी करण्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांना डच्चू :
पीआयए व्यवस्थापनाने खर्च कमी करण्यासाठी सुमारे एक हजार ‘अतिरिक्त कर्मचारी’ नोकरीवरून काढून टाकले आहेत. पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी इस्लामाबाद येथे विमान वाहतूक विभागाची बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार असून पीआयएच्या व्यवसाय योजना, आवश्यकता व इतर विषयांवर निर्णय घेतले. दरम्यान, पाकिस्तानी पंतप्रधानांनी पीआयएच्या मुख्य कार्यकारीनीला विमानसेवेची कामगिरी सुधारण्यासाठ आणि प्रवासाच्या सुविधांमध्ये वाढ करण्याचे निर्देश दिले. हा निर्णय त्याचाच एक भाग असल्याचे बोलले जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त –