चीन-पाक एकत्रितरित्या रचतायेत भारताविरूध्द षडयंत्र, NSA डोवाल यांनी 7 वर्षांपूर्वी दिला होता इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लडाखच्या पॅंगॉन्ग आणि गलवानबाबत भारत आणि चीनमधील संबंध खूप तणावपूर्ण आहेत. एकीकडे सरकार मिलिटरी लेव्हलपासून राजनयिक स्तरावर चीनबरोबरचा सीमावाद सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर चीन लाइन ऑफ ऍक्चुअल कंट्रोलवर (एलएसी) आपल्या सैनिकांची संख्या सातत्याने वाढवत आहे. स्पष्ट आहे की, चीनचा हेतू धोकादायक आहे आणि म्हणूनच चीनवर विश्वास ठेवू शकत नाही असा चीनच्या निरीक्षकांचा विश्वास आहे.

एका वृत्तसंस्थेनुसार, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी २०१३ मध्येच सांगितले होते की, चीन पाकिस्तानसह भारताविरूद्ध हेरगिरी करत आहे आणि उत्तर पूर्वच्या अतिरेकी संघटनांना शस्त्र पुरवत आहे. इतकेच नव्हे तर Chinese Intelligence : From a Party Outfit to Cyber Warriors नावाने लिहिलेल्या लेखात माजी आयबी चीफ आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सांगितले होते की, चीनचे भारतासह जगभरातील देशात गुप्तहेर पसरले आहेत, जे चीनसाठी हेरगिरी करत आहेत. ज्या वेळी अजित डोवाल यांनी हा लेख लिहिला त्या वेळी ते दिल्लीच्या थिंक टँक विवेकानंद आंतरराष्ट्रीय फाऊंडेशनशी संबंधित होते आणि सुमारे एक वर्षानंतर एनडीए सरकारमध्ये त्यांना एनएसएची जबाबदारी दिली.

अजित डोवाल यांच्या म्हणण्यानुसार, दलाई लामा भारतात आल्यानंतर चीनविरूद्ध हेरगिरी अधिक तीव्र झाली होती आणि अक्साई चिनच्या भागात ल्हासा आणि झिनझियांगला जोडणार्‍या राष्ट्रीय महामार्ग २१९ वर रस्ता तयार करण्याचे काम सुरु केले होते. डोवाल यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय गुप्तचर यंत्रणांनी त्यावेळी चिनी कारवायांची माहिती सरकारला देण्यास सुरवात केली होती, परंतु एजन्सीच्या अहवालाकडे सरकारने लक्ष दिले नाही. २१ नोव्हेंबर १९५९ रोजी करम सिंह जे इंटेलिजेंस ब्युरोमध्ये केंद्रीय मध्यवर्ती इंटेलिजेंस एजन्सीच्या पदावर तैनात होते, त्यांची चिनी सैनिकांशी चकमकही झाली होती ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता.

अजित डोभाल यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा दलाई लामा यांनी १९५९ मध्ये त्यांच्या ८० हजार सैनिकांसह भारतात आश्रय घेतला, तेव्हापासून चिनी गुप्तचर संस्था भारतात सक्रिय झाल्या. २०१३ मध्ये हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळेतून चिनी सैन्याच्या एका गुप्तहेर Pema Tsering ला अटक करण्यात आली होती, जो बनावट ओळखपत्राद्वारे आपली ओळख लपवून दलाई लामा यांची हेरगिरी करत होता.

चीनचे हेर भारतात पॉलिटिकल इंटेलिजन्स, डिफेन्स इंटेलिजन्स आणि ईशान्य लढाऊ संघटनांशी संगनमत करून भारताविरूद्ध कट रचण्यात आले असल्याचेही डोभाल यांनी सांगितले आहे. १८ जानेवारी २०११ रोजी Wang Qing नावाच्या एका महिला चिनी जासूसला नागालँडमधून अटक केली होती, जिने नागालँडच्या अतिरेकी गट T Muivah बरोबर गुप्त बैठक घेतली होती. या संदर्भात भारताने चीनकडे अधिकृत निषेधही नोंदवला होता.

अजित डोवाल यांच्या म्हणण्यानुसार, चीनच्या गुप्तहेर संस्था भारताविरूद्ध खूप सक्रिय आहेत आणि या अतिरेकी गटांना चीनकडून शस्त्रे, पैसा आणि प्रशिक्षण दिले जाते. १९६६ मध्ये ३०० नागा अतिरेक्यांच्या गटाला युनानमध्ये शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देऊन भारतात पाठवले गेले होते. या गटात नागा अतिरेकी Muivah आणि Isak Swu या नेत्यांचाही समावेश होता, ज्यांनी चीनमधून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणली होती. डोवाल यांच्या म्हणण्यानुसार, ही मालिका सतत सुरू आहे.

भारताला अस्थिर करण्यासाठी चीन गेली कित्येक वर्षे सक्रिय आहे, परंतु सरकारने चीनच्या या षडयंत्रांकडे दुर्लक्ष केले किंवा त्या विरोधात काही वेळा बोलणे टाळले. २०१० मध्ये पुन्हा एकदा नेपाळहून परत आलेल्या Anthony Shimray नावाच्या उत्तर-पूर्व सैनिकाला भारतीय सुरक्षा यंत्रणांनी पकडले तेव्हा भारताविरूद्ध कट रचल्याचा मोठा खुलासा पुन्हा एकदा समोर आला.

डोवाल यांच्या म्हणण्यानुसार Anthony Shimray ने सांगितले की, चीनकडून एके-४७, एम १६ रायफल्स, मशीन गन, स्निपर रायफल आणि रॉकेट लॉन्चर्स यासारख्या १८०० मोठ्या मालवाहू वस्तू भारतात पाठवण्याचे त्यांचे नियोजन आहे. चीनच्या Beihei हून ही शस्त्रे बँकॉकमधील एका एजंटमार्फत बांगलादेशातील काक्सच्या बाजारात पाठवली जाणार होती, त्यानंतर ही शस्त्रे उत्तर पूर्वच्या अतिरेकी गटात पोचवण्यात येणार होती.

चीनने भारताविरूद्ध मोठा कट रचल्याचा खुलासा करताना अजित डोवाल यांनी म्हटले आहे की, चीन भारताविरोधात पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचीही मदत घेत आहे. ईशान्येकडील लढाऊ गटांशी संपर्क साधण्याच्या उद्देशाने चीन आणि पाकिस्तानने मिळून ढाका येथे भारताविरूद्ध ऑपरेशनल हब बांधले होते.

जगभरात पसरलेल्या हेरांद्वारे चीन कशी महत्वाची माहिती गोळा करत आहे, याबाबत अजित डोवाल यांनी इशारा दिला होता. चीनने सायबर ते आर्थिक, संरक्षण आणि तांत्रिक क्षेत्रात आपल्या हेरांद्वारे खळबळ उडवली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like