‘टोळ’ किडयामुळे पाकिस्तानवर मोठं ‘संकट’, भारताला देखील ‘धोका’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला आता एका नवीन संकटाने घेरले आहे. पाकिस्तानधील चार राज्यांमध्ये एका किड्याने सर्वांना जेरीस आणले आहे. ‘टोळ’ नावाच्या या किड्याने पाकिस्तानसह भारतातील अनेक प्रदेश संकटात आहेत. सामान्य नागरिकांपासून ते सरकारपर्यंत सगळेच त्रासलेले आहेत. पाकिस्तानमध्ये तर या किड्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी हेलिकॉप्टरद्वारे औषध फवारणी करण्यात आली आहे. त्यासाठी पाकिस्तान सरकारने मीरपूर जिल्ह्यात एक खास विमान यासाठी तैनात केले आहे.

या समस्येवर मार्ग काढण्यासाठी मुनाबाव येथे भारत आणि पाकिस्तान यांच्या अधिकाऱ्यांमध्ये जवळपास चार तास बैठक पार पडली. यासाठी पाकिस्तानने दहा हजार हेक्टर क्षेत्रात औषध फवारणीचे काम हाती घेतले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालत खाद्य सुरक्षा मंत्र्यांना मिरपूरमध्ये पाठवले आहे. या किड्यांमुळे पाकिस्तानमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

त्याचबरोबर मॉन्सूनचा विचार करता भारतातील राजस्थानकडे सध्या या किड्यांचा प्रवास सुरु असल्याचे समजत आहे. दरम्यान, भारतात देखील या किड्यांचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. राजस्थानमधील जैसलमेरमध्ये काही दिवसांपूर्वी हे किडे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले होते.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही

..म्हणून ‘बिग बॉस’ बॅन करण्यासाठी वकिलाची तक्रार दाखल

अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिराने ‘तेथे’ फोटो काढला, त्यानंतर मात्र,.

You might also like