दानिश कनेरियासह ‘हे’ 7 ‘गैर-मुस्लिम’ खेळाडू पाकिस्तानसाठी खेळले क्रिकेट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने आपल्या पाकिस्तानी संघाचा माजी सहकारी दानिश कनेरियाशी असलेल्या भेदभावाबद्दल बोलले आहे. अख्तरने एका चॅट शोमध्ये म्हटले आहे की, माजी फिरकीपटू डॅनिश कनिरिया हिंदू होता, म्हणूनच त्यांच्याशी भेदभाव केला जात होता. पाकिस्तान हा एक मुस्लिम देश आहे आणि परंतु पाकिस्तान क्रिकेट संघात जे मुस्लिम नाहीत त्या खेळाडूंशी भेदभाव करण्यात आला. दानिश कनेरियासह ७ बिगर मुस्लिम खेळाडू पाकिस्तानी संघाकडून खेळले आहेत.

दानिश कनेरिया
पाकिस्तानी क्रिकेट संघाकडून खेळणारा दानिश कनेरिया हा अखेरचा बिगर मुस्लिम खेळाडू होता. सन २००० मध्ये कनेरियाने आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात केली. कनेरियाने पाकिस्तानकडून ६१ कसोटी सामने खेळले होते आणि ते यशस्वीही झाले. नंतर फिक्सिंगमध्ये नाव आल्यामुळे कनेरियाला पाकिस्तान संघातून वगळण्यात आले. पाकिस्तानकडून २६१ कसोटी विकेट्स घेणारा दानिश कनेरिया हा सर्वाधिक चांगला गोलंदाज आहे. अब्दुल कादिर, सकलेन मुश्ताक आणि मुश्ताक अहमद ही पाकिस्तान क्रिकेटमध्ये दानिश कनेरियापेक्षा मोठी नावे मानली जातात पण कसोटी विकेटच्या बाबतीत ६१ सामने खेळणाऱ्या कनेरियाच्या तुलनेत हे सर्व मागे आहेत.

युसुफ योहाना
युसुफ योहाना या सर्वोत्तम फलंदाजांनी पाकिस्तानी संघासाठी ९० कसोटी सामने खेळले आहेत. युसुफने १९९८ साली आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली आणि पाकिस्तानी क्रिकेट संघात नॉन-मुस्लिम खेळाडू म्हणून प्रवेश केला. युसुफ योहाना हा ख्रिश्चन धर्माचा होता, परंतु २००४ मध्ये त्याने इस्लाम धर्म स्वीकारला आणि आपले नाव मोहम्मद युसुफ ठेवले.

अनिल दलपत सोनवारिया
पाकिस्तानकडून खेळलेला माजी विकेटकीपर अनिल दलपत सोनवरिया हा दानिश कनेरियाचा चुलत भाऊ आहे. अनिल दलपत हा पाकिस्तान क्रिकेट संघाचा पहिला हिंदू खेळाडू म्हणून खेळला. अनिल दलपतने १९८४ मध्ये विकेटकीपर फलंदाज म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. अनिल दलपतला पाकिस्तान संघात फारसे यश मिळवता आले नाही आणि तो फक्त ९ कसोटी सामने खेळू शकला. अनिल दलपतने आपल्या कारकिर्दीत या सामन्यांमध्ये १६७ धावा केल्या.

एंटाओ डिसूजा
ईसाई धर्मच्या एंटाओ डिसूजाने १९५९ मध्ये पाकिस्तानकडून क्रिकेट खेळण्यास सुरवात केली पण त्याला आपल्या कारकीर्दीची प्रगती करता आली नाही आणि फक्त ६ कसोटी सामने खेळता आले. त्यांचा जन्म गोवा, भारत येथे झाला होता, परंतु पाकिस्तान आणि कराचीच्या वतीने क्रिकेट खेळला. 1947 च्या फाळणीनंतर डिसोझाचे वडील पाकिस्तानमध्ये स्थायिक झाले. पाकिस्तानसाठी त्याने सहा टेस्ट मॅच खेळल्या, ज्यामध्ये १७ विकेट घेतल्या.

डंकन शार्प
ईसाई धर्मसोबत नाते ठेवणारा डंकन शार्पने पाकिस्तानकडून खेळण्यास सुरुवात केली. डंकन शार्प आपली कारकीर्द वाढवू शकला नाही आणि फक्त दोन कसोटी सामने खेळू शकला. अँग्लो-पाकिस्तानी डंकन अल्बर्ट शार्पने पाकिस्तानकडून फक्त तीन कसोटी सामने खेळले आणि २२.३३ च्या सरासरीने १३४ धावा केल्या.

वॉलिस मॅथ्यूज
ईसाई धर्मच्या वॉलिस मॅथ्यूजने १९७४ मध्ये पाकिस्तानकडून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली होती. मॅथ्यूजने पाकिस्तानकडून २१ कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने ७८३ धावा केल्या. वॉलिस मॅथ्यूज हा पाकिस्तानमधील पहिला गैर-मुस्लिम खेळाडू खेळला होता.

सोहेल फजल
ईसाई धर्माचे सोहेल फजलने पाकिस्तानकडून दोन एकदिवसीय सामने खेळले. १९८९-९० च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात सोहेल फजलने टीमचा स्कोर २५० वर पोहचवला होता. पाकिस्तानने हा सामना ३८ धावांनी जिंकला. या सामन्यात त्याला जावेद मियांदादच्या आधी फलंदाजीसाठी पाठविण्यात आले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/