ICC World Cup 2019 : पराभवानंतर पाकिस्तानच्या टीममध्ये झाले ३ ‘ग्रुप’

मँचेस्टर : वृत्तसंस्था – वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध झालेल्या सामन्यात पाकिस्तानला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे पाकिस्तानचा संघ टीकेचा धनी ठरला आहे. या पराभवामुळे पाकिस्तानचा वर्ल्डकपमधील खेळ येथेच संपल्याच्या भावना चाहत्यांकडून व्यक्त होत आहेत.

तीन खेळाडूंचे तीन गट

दरम्यान, या दारुण पराभवानंतर पाकिस्तानच्या संघात ड्रेसिंग रुममध्ये फूट पडली आहे. पाकिस्तानचे खेळाडू ऐकमेकांतच भांडण करत आहेत. पाकिस्तानच्या एक वृत्तवाहिनी दुनिया ने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान संघात तीन गट पडले आहेत. एक गट मोहम्मद आमिरचा तर दुसरा गट इमाद वसिमचा आणि तिसरा गट कर्णधार सर्फराज अहमदचा. असे तीन गट पडले आहेत. सर्फराजच्या बाजूने फार कमी खेळाडू आहेत.

पाकिस्तानच्या समा वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, भारताविरुद्ध झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज ड्रेसिंग रूममध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंविरुद्ध खूप भडकला होता.

पाकिस्तानला आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये चार सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. यामध्ये वेस्टइंडीजकडून झालेल्या मानहानीकारक पराभवाचा देखील समावेश आहे. पण तेव्हा पाकिस्तानच्या खेळाडूंवर माजी खेळाडूंवर एवढी टीका केली नव्हती. पाकिस्तानचा पुढील सामना २३ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध असणार आहे.

सिनेजगत

खरंच की काय ! कॅटरीना करणार ‘दबंग’ सलमान खानशी लग्न ?

गर्दीत अडकलेल्या ‘फिटनेट क्‍वीन’ दिशा पाटनीची पुन्हा ‘त्याने’ केली सुटका, पहा दिशाचे ‘ते’ सर्व फोटो

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

#YogyaDay 2019 : ‘सौंदर्य’ आणि ‘तारुण्य’ वाढविणारे नटराजन आसन

 दम्याने त्रस्त असाल तर ” घ्या ” ही काळजी

“टाच” दुखीमुळे त्रस्त असाल तर, जाणून घ्या टाच दुखीची कारणे आणि उपाय

या टिप्स वाचून “मानसिक” आजाराला करा बाय-बाय

“पॅरालिसिसकडे” दुर्लक्ष करू नका