पाकिस्तानच्या विदेशमंत्र्यांकडून काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेण्याची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर भडकलेल्या पाकिस्तानने हा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघात नेला. यानंतर या मुद्द्यावर समर्थन मागणाऱ्या पाकिस्तानचा मोठ्या प्रमाणात हिरमोड झाला असून सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला पाठिंबा देणारा चीनदेखील तोंडघशी पडला. UNSC मध्ये झालेल्या या बैठकीत पाकिस्तान आणि चीनने मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून देखील काश्मीरविषयी कोणतेही अधिकृत निवेदन जारी केले नाही. त्यामुळे चीनचा तिळपापड झाला.

त्यानंतर आता पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर त्यांच्या या निर्णयावर पाकिस्तानमधील विविध मंत्रालयांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. पाकिस्तानी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार शाह महमूद कुरैशी यांनी याची घोषणा केली असून कायदा मंत्रालय लवकरच याची माहिती विस्ताराने सगळ्यांना देणार आहे. मात्र आता यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असून आंतरराष्ट्रीय प्रकरणांच्या अभ्यासकांनी देखील पाकिस्तानच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे.

याचवेळी पाकिस्तान ‘तहरीके इंसाफ पक्षा’च्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत बोलताना सांगितले कि, आम्ही सध्या ब्रिटनमधील निष्णात वकिलांच्या संपर्कात असून त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार आम्ही काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयात उचलून धरणार आहोत. पाकिस्तानच्या पंतप्रधानांना याबाबत बेन एमर्सन नावाच्या व्यक्तीने मार्गदर्शन केले असून या व्यक्तीनेच हा मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयात उचलून धरण्याविषयी सांगितले असल्याचे म्हटले आहे. भारतीय सरकारच्या काश्मीरच्या निर्णयावर आंतरराष्ट्रीय न्यायालयात उचलून धरण्याचे प्रयत्न करून या मुद्द्याला आंतरराष्ट्रीय मुद्दा करण्याचा विचार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, याआधी पाकिस्तानने हा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघात नेला. यानंतर या मुद्द्यावर समर्थन मागणाऱ्या पाकिस्तानचा मोठ्या प्रमाणात हिरमोड झाला असून सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला पाठिंबा देणारा चीनदेखील तोंडघशी पडला. त्यामुळे भारताला या मुद्द्यावर पराभूत करणे पाकिस्तानसाठी खूप अवघड गोष्ट असणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like