पाकच्या विमानांनी केला प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यातील मिराज विमानांचा पाठलाग करुन त्यांना प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न पाकस्तानच्या हवाई दलाने केल्याचे समोर येत आहे. मात्र, त्यात पाकिस्तान हवाई दल पूर्णपणे अयशस्वी ठरले आहे.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत काहीना काही कारवाई करणार याचा अंदाज पाकिस्तानला आला होता. त्यादृष्टीने पंतप्रधान इम्रान खान यांनी तशा सूचना दिल्या होत्या. सैनिकांसाठी हॉस्पिटलमधील २५ टक्के खाटा राखून ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे पाकिस्तान लष्कर तयार होते. भारतीय हे लष्करामार्फत हल्ला करेल, असा पाकिस्तानचा अंदाज होता. त्यादृष्टीने सीमा रेषेवर सर्व जय्यत तयारीत होते. मात्र, भारताने हवाई दलाचा वापर करुन हा हल्ला केल्याने सुरुवातीला पाकिस्तान काहीसा चकीत झाला. तरीही पाकिस्तानचे हवाई दल तयारीत होते.

भारताच्या मिराज २००० विमानांच्या तुल्यबल असे अमेरिकन एफ १६ विमानांचा ताफा पाकिस्तानकडे आहे. बालाकोट येथे आतमध्ये घुसून भारताने हल्ला केल्यानंतर काही मिनिटात पाकिस्तानच्या एफ १६ विमानांनी आकाशात उड्डाण करुन या विमानांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना त्यात यश आले नाही. एफ १६ विमानांचा मारा चुकवून भारतीय विमाने ही यशस्वीपणे भारतीय हद्दीत सुरक्षितपणे परत आली.

पाकच्या सरंक्षण मंत्र्यांचा जपान दौरा रद्द
पुलवामा हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहमद कुरेशी यांनी सोमवारीच आपला जपानचा दौरा रद्द केला होता.

महत्वाच्या बातम्या –

भारताच्या मिराज विमानांकडून जैश-ए-मोहम्मदच्या तळावर १००० किलोचा बाॅम्ब हल्ला 

भारताने केलेल्या बाॅम्ब हल्यात जैशचे लाँच पॅड, नियंत्रण कक्ष उध्वस्त 

भारतीय हल्ल्याचा पाकिस्तानने व्हिडिओ केला जारी 

पाकिस्तानवर बाॅम्बहल्ला : पंजाबमधील आदमपूरहून केली कारवाई 

त्या हजार जखमांच्या बदल्यात भारताने १००० बॉम्ब देणे योग्यच