इमरान सरकारची क्रुरता, पाकिस्तानी सेनेला ‘दुश्मन’ म्हणणार्‍या महिला वकिलाचा छळ, केलं टॉर्चर (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानी सैन्यांना दुश्मन ठरवणाऱ्या एका वकील महिलेला पकडून मोठी कठोर शिक्षा देण्यात आली. चार दिवस तिला टॉर्चर करून, तिचे हात-पाय बांधून तोंडात कापडाचा बोळा कोंबून, तिला बेशुध्द अवस्थेत एका शेतात फेकण्यात आलं. ही घटना पंजाब प्रांतातील मैलासी येथील आहे. या घटनेच्या निषेद्धार्थ सोशल मीडियावर रोष व्यक्त केला जात आहे.

मानवाधिकार कार्यकर्ता आरिफ अजाकिया यांनी ही माहिती देत महिला वकिलाने केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ पोस्ट केला. जीओ न्यूजच्या रिपोर्ट नुसार त्या महिलेला 14 ऑगस्टला तिच्या ऑफिसमधून चार जणांनी उचलून नेलं होतं. पीडितेने सांगितले की, तिला चार दिवस खूप टॉर्चर केलं गेलं, त्यानंतर शेतात फेकण्यात आलं. पोलिसांनी तिला हॉस्पिटल मध्ये दाखल केलं. या प्रकरणा संदर्भात पीडितेच्या मुलाने एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी या महिलेचा जबाब नोंदवला आहे.

पाक सेनेने सरकारला बनवलंय कठपुतली

पाकिस्तानी सैन्यांवर तिथल्या राजकारणात आणि परराष्ट्र धोरणामध्ये हस्तक्षेप करण्याचा आरोप केला जातो. पाक सेनेनी सरकारला देखील कठपुतली बनवलं आहे. देश सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांनी अनेकांना गायब केल्याचा आणि मारून टाकल्याचा आरोप पाकिस्तान सैन्यांवर केला आहे.

पाकिस्तानची खराब अर्थव्यवस्था

दुसरीकडे इमरान सरकार ढासळलेल्या अर्थव्यवस्थेशी सामना करत आहे. या वर्षीच्या ऑक्टोबर फायनान्शियल ऍक्शन टास्कची होणारी बैठक जसजशी जवळ येत आहे तशी पाकिस्तान सरकारची चिंता वाढत चालली आहे. चिंतेचं कारण असं की, पंतप्रधान इमरान खानला सांगावं लागणार आहे, जर एफटीएफने पाकिस्तानवर प्रतिबंध घातले तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून जाईल.