पाकिस्तानला मोठा आर्थिक झटका ! आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला हरल्यानंतर ४० हजार कोटींचे नुकसान

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यापुढील समस्या वाढताना दिसून येत आहे. आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पाकिस्तान सरकारच्या तिजोरीवर अजून भार पडणार आहे. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालयात एक मोठा खटला हरला आहे. यामुळे पाकिस्तानला ४० हजार कोटींचे नुकसान झाले आहे. जुलै महिन्याच्या सुरवातीला IMF ने पाकिस्तानला आर्थिक संकटांतून बाहेर काढण्यासाठी ६ अब्ज डॉलरचे बेलआऊट पॅकेज सशर्त मंजूर केले होते. एवढ्या साऱ्या आर्थिक संकटांना तोंड देणाऱ्या पाकिस्तानला आता अजून एका आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

चला जाणून घेऊ या काय आहे प्रकरण

इंटरनॅशनल सेंटर फॉर सेटलमेंट ऑफ इन्वेस्टमेंट डिस्प्यूट्स (ICSID) ने बलुचिस्तानमधील रेको डिक खदान व्यवहार रद्द केल्यामुळे पाकिस्तानवर ५ अब्ज ९७ कोटी डॉलर इतका दंड ठोठावला आहे.

पाकिस्तान अजून एक खटला हरला

या प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानने अजून एक खटला हरला आहे. हा दंड पाकिस्तानच्या टेथयान कॉपर कंपनी (TCC) ला भरावा लागणार आहे. जगभरातील अर्थतज्ज्ञ पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याचे सांगत आहेत. गेल्या १० वर्षातच पाकिस्तानवरील कर्ज ६ हजार अब्जावरून ३० हजार अब्जावर गेले आहे. पाकिस्तान दरवर्षी ४ हजार अब्ज रुपयाचे कर जमा करते. त्यातील आर्धी रक्कम कर्जाची फेड करण्यासाठीच वापरली जाते. उरलेल्या पैशातून देशाचा कारभार चालविणे कठीण झाले आहे.

 

Loading...
You might also like