पेशावर : वृत्तसंस्था – Pakistan Mosque Blast | पाकिस्तान पुन्हा एकदा आत्मघातकी हल्ल्यामुळे हादरले आहे. पाकिस्तान मधील पेशावर (Peshawar Mosque Blast) येथील मशिदीवर मोठा आत्मघातकी हल्ला झाला असून यात अनेक लोक मृत्युमुखी पडल्याचे बोलले जात आहे. आज दि.३० रोजी पेशावर मधील पोलिस लाईन्स मशिदीत नमाज सुरू असताना ही घटना घडली. मशिदीत (Pakistan Mosque Blast) नमाज सुरू असताना अचानक झालेल्या या स्फोटामुळे अनेकांचा जीव गेला आहे.
पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, या स्फोटात एकूण २८ जणांचा जागीच मृत्यु झाला तर १५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची देखील शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हा आत्मघातकी हल्ला होता. या हल्ल्यात झालेल्या स्फोटात मशिदीचे छत पूर्ण उडाले आहे. सिकंदर शेख या पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मशिदीत जवळपास २६० लोक असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Pakistan | At least 50 people were injured when a “suicide attacker” blew himself up in a mosque located in Peshawar's Police Lines area during prayers: Geo News
— ANI (@ANI) January 30, 2023
या आत्मघातकी हल्ल्यात पोलिस कर्मचाऱ्यांचा देखील मृत्यु झाला आहे.
अनेक जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
तर अनेक मृतदेह मशिदीत अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सध्या मशिद परिसराला पाकिस्तानी लष्कराने घेराव घातला आहे.
आणि मदतकार्य युध्दपातळीवर सुरू आहे. जखमींवर पेशावर येथील रिच लेडी रिडिंग हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी यांनी जखमींच्या उपचारासाठी मुस्लिम लीगच्या कार्यकर्त्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.
Web Title :- Pakistan Mosque Blast | blast inside the mosque near police lines in peshawar pakistan
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Maharashtra Politics | वरळीत आदित्य ठाकरेंना मोठा धक्का, माजी नगरसेवकाचा शिंदे गटात प्रवेश
Chitra Wagh | ‘मी कोणाचीच तुलना केली नाही’, ‘त्या’ वक्तव्यावरुन चित्रा वाघ यांची सारवासारव (व्हिडिओ)