Satyajit Tambe | ‘मी अपक्ष उमेदवार आहे, आणि अपक्षचं राहील..’ कुठलंही राजकीय भाष्य आजच्या तारखेला करणार नाही – सत्यजीत तांबे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – Satyajit Tambe | मागील दहा पंधरा दिवसांमध्ये जे राजकारण झालं. ज्यातून माझ्या परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून केला गेला. मी तर अपक्ष आहे आणि अपक्षचं राहिल. असं वक्तव्य सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी आज मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले असता, माध्यमांशी बोलताना केले.

 

राज्यातील पदवीधर मतदारसंघासाठी (MLC Elections) आज निवडणुक प्रक्रिया पार पडत असून यात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सत्यजीत तांबे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सत्यजीत तांबे यांनी सूचक वक्तव्य केले आहे. ‘मी तर अपक्ष उमेदवार आहे आणि अपक्ष राहील. याच्यापेक्षा जास्त कुठलेही राजकीय भाष्य आजच्या तारखेला करणार नाही.’ अशी भूमिका आज माध्यमांशी बोलताना सत्यजीत तांबे यांनी घेतली.

 

तर यावर पुढे बोलताना सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) म्हणाले की, ‘लवकरच जे मागचे दहा पंधरा दिवसांमध्ये राजकारण झालं. ज्याच्यातून परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. याच्यावर जे अर्धसत्य ठेवून ज्या पद्धतीने एकच बाजू मांडली गेली. त्यामुळेच मी मुद्दाम कुठली प्रतिक्रिया दिली नाही. कारण शब्दाने शब्द वाढू नये आपण ज्या पक्षांमध्ये आयुष्यभर राहिलो. त्या पक्षाला अजून लोकांसमोर वाईट करू नये, म्हणून खरं तर बोललो नाही. वेळ आल्यावर या सगळ्या प्रश्नांना उत्तर देणार.’ असं म्हणत सत्यजीत तांबे यांनी उलटसुलट होत असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला.

ते पुढे म्हणाले, ‘नाशिक पदवीधर मतदारसंघातील (Nashik Graduate Constituency) लोकांचे प्रेम पाहून मन भरून येतं.
शिवाय इतक्या प्रेमाने पाचही जिल्ह्यातील लोक पाठीशी उभे आहे.
हा मतदारसंघ अतिशय मोठा मतदार संघ असून यात ५४ तालुक्यांचा समावेश आहे.
चार हजार पेक्षा जास्त गावांचा मतदारसंघ आहे. उत्तर महाराष्ट्र, खानदेशसह इतर भागातून लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
त्यामुळे निश्चितच त्यांच्या ऋणात राहणं पसंत करून येणाऱ्या काळामध्ये इथल्या
लोकांचा विश्वास सार्थ करण्याचं काम करेल, असे आश्वासन यावेळी सत्यजीत तांबे यांनी मतदारांना दिले.

 

आता आम्हाला मताधिक्य किती जास्त होतं, याचीच उत्सुकता आहे.
विविध क्षेत्रातील लोक माझ्या पाठिशी उभे राहिले आहेत. असे यावेळी बोलताना सत्यजीत तांबे म्हणाले.

 

Web Title :- Satyajit Tambe | satyajit tambes reaction after voting nashik graduate constituency

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Amyra Dastur | अभिनेत्री अमायरा दस्तूरच्या ‘या’ लूकने चाहत्यांना लावले वेड

Maharashtra Political Crisis | शिवसेना कुणाची? यावर आज निवडणुक आयोगापुढे महत्वाची सुनावणी

Priyanka Chaturvedi | शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींचे शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र; म्हणाल्या…