Chitra Wagh | ‘मी कोणाचीच तुलना केली नाही’, ‘त्या’ वक्तव्यावरुन चित्रा वाघ यांची सारवासारव (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जशी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) यांनी रोवली तसचं, स्त्री कर्तृत्वाचा पुरस्कार करण्याच्या नव्या परंपरेचा पायंडा दादांच्या हातून पाडला गेला. उगा पराचा कावळा करून, अर्थाचा अनर्थ करण्याचे काम काही जण करत असतील तर त्यांनी वेळीच स्वतःला सावरुन लवकरच सुधारावे, ही विनंती!!! असं लिहीत भाजप (BJP) महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत तुलना केल्यामुळे चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. यावर त्यांनी स्पष्टीकरण देत सारवासारव केली.

 

मी कोणाचीच तुलना केली नाही
जे माझ्यावर टीका करत आहेत. त्यांच्या पक्षात असताना मी अनेकदा हे वाक्य बोलले आहे. तेव्हा कोणी आक्षेप घेतला नाही. जे जेंटर इक्वालिटीवर बोलतात तेच आज आरोप करत आहेत. मी कोणाचीच तुलना केली नाही. त्यांची जागा कुणीच घेवू शकत नाही. पण ज्यांची समजून घेण्याची कुवत नाही. त्यांना कृतीत कहीच चांगले दिसले नाही. असं म्हणत वाघ (Chitra Wagh) यांनी अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्यावर टीकास्त्र सोडले.

 

तर त्यांनी कृतीत आणले
पुण्यात जिथे महिला स्वातंत्र्याची सुरुवात झाली तिथे हे घडत होते. मी काल माझ्या भावना सांगता येणार नाही अशा आहेत. काल दादा फक्त बोलले नाही तर त्यांनी कृतीत आणले. कोणीच तुलना करु शकत नाही, असा खुलासा चित्रा वाघ यांनी केला.

दादांनी माझे औक्षण केलं
मला आश्चर्य वाटतंय की, कोणतेही वाक्य पूर्ण न ऐकता त्यावरुन वादंग निर्माण करायचे. काल हळदी कुंकू कार्यक्रम होता. पण माझे स्वागत करताना मला पुरुषांनी औक्षण केले. काल पाच पुरुषांनी माझे औक्षण केले दादा म्हणाले की, तुम्ही भगिणी नेहमी आमचे यश चिंतन करता आता पुरुषांनी पण हे भगिणींसाठी केले पाहिजे, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

 

 

काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ?
चित्रा वाघ म्हणाल्या, महिलांच्या जेवढ्या चळवळी झाल्या त्या सर्व चळवळींच महत्वाचं केंद्र पुणे आहे.
आजचीही नवीन सुरुवात येथून झाली आहे. आजच्या कार्यक्रमात देखील एका महिलेला पाच पुरूषांनी ओवाळं.
चंद्रकांत पाटील हे नेहमीच परिवर्तन घडवत असतात. आज देखील त्यांच्या माध्यमातून नवीन पायंडा पडला आहे.
त्यामुळेच मी नेहमी म्हणते, आम्हाला सावित्रीबाई (Savitribai Phule) घरोघरी दिसायला लागल्या आहेत.
मात्र चंद्रकांत पाटील आणि हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्या सारख्या ज्योतिबांचा शोध जारी आहे.
असे जोतिबा समाजात जास्तीत जास्त तयार व्हाव्हेत याच आजच्या दिवसानिमित्त मी शुभेच्छा देईन असं चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.

 

Web Title :- Chitra Wagh | chitra wagh reaction to the statement compared with jyotiba phule and chandrakant patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Navneet Rana | नवनीत राणा यांना न्यायालयाचा दणका!; कोर्टाकडून नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंह कौर फरार घोषीत

Maharashtra Political Crisis | शिवसेना कुणाची? यावर आज निवडणुक आयोगापुढे महत्वाची सुनावणी

Priyanka Chaturvedi | शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींचे शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र; म्हणाल्या…