नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना खोट्या बँक अकाउंट प्रकरणात सोमवारी अटक करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी असलेले झरदारी यांच्यावर खोटी बँक खाती उघडल्याचा आरोप ठेवून NAB (नॅशनल अकाउंटिबिलिटी ब्यूरो)च्या १५ सदस्यीय टीमने ही अटकेची कारवाई केली आहे. झरदारी यांना अटक केल्यानंतर पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.
पाकिस्तानचे आघाडीचे वृत्तपत्र डॉनने दिलेल्या माहितीनुसार, झरदारी आणि त्यांची बहीण फरियाल यांनी खोट्या बॅँक अकाउंट प्रकरणी जामीन मिळण्यासाठी याचिका दाखल केली होती. याचिका फेटाळल्यानंतर पोलिसांनी झरदारी यांना अटक केली. या दरम्यान त्यांच्या घरी जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते.
Pak Media: NAB has arrested former Pakistan President Asif Ali Zardari in fake bank accounts case. (File pic) pic.twitter.com/zwI5Ci0sf3
— ANI (@ANI) June 10, 2019
काय आहे प्रकरण ?
हे प्रकरण खोट्या बँक अकाऊंटच्या माध्यमातून ४.४ कोटी रुपयाची संशयित देवाण घेवाण याच्याशी संबधीत आहे. हे अकाउंट ‘मेसर्स ए वन इंटरनैशनल’ या नावाने आहे जे की खोटे आहे. या अकाउंटमध्ये ४.४ कोटी पाठवण्यात आले होते ज्यामध्ये ३ कोटी झरदारी ग्रुपला दोन वेगवेगळ्या वेळी पाठवण्यात आले होते.
कोण आहेत झरदारी?
आसिफअली झरदारी हे पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे पती असून, २००८ ते २०१३ या काळात त्यांनी पाकिस्तानचे राष्ट्रपतीपद भूषवले होते. पाकिस्तान पीपल्स पार्टी हा त्यांचा पक्ष असून त्यांचा मुलगा बिलावल भुट्टो पाकिस्तान पीपल्स पार्टीचा अध्यक्ष आहे.
आरोग्यविषयक वृत्त –
यामुळेही वाढू शकतो ‘टाइप-२ डायबिटीस’चा धोका
चेहऱ्यावरच्या सुरकुत्या घालवायच्या आहेत ? घरीच बनवा अँटी एजिंग फेसपॅक
‘या’ पाण्याचे आहेत अनेक फायदे ; अशक्तपणा दूर करण्यासह बरच काही
काळजी घ्या ; कमी झोप घेण्याचा थेट संबंध ‘ब्लड प्रेशर’शी