इम्रान खान ऐवजी सचिन तेंडुलकरचा ‘फोटो’, पाक पंतप्रधानांचा स्वीय सहाय्यक ‘ट्रोल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे विशेष सहाय्यक नईम उल हक ट्विटरवर सचिन तेंडुलकरचा फोटो पोस्ट करून अडचणीत आले आहेत. नईम यांनी पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्याबाबत एक पोस्ट केली. मात्र, या पोस्टमध्ये त्यांनी इम्रान खान यांच्याऐवजी भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा फोटो वापरला. या ट्वीटवरून सध्या नईम उल हक यांना ट्रोल केले जात आहे.

नईम यांनी ट्विटरवर सचिन तेंडुलकरचा क्रिकेटच्या पदार्पणातील फोटो शेअर करीत इम्रान खान, १९६९ असे कॅप्शन दिले. त्यांच्या या अपुऱ्या ज्ञानामुळे युजर्सनी चांगलीच फिरकी घेतली आहे. .

विशेष म्हणजे नईमने शेअर केलेला फोटो सचिनचा असल्याचे पाकिस्तानी माध्यमांनीदेखील सांगितले आहे. या पोस्टवर त्याची खिल्ली उडवण्यासाठी नेटिझन्स कोणाचंही नाव देऊन विविध क्षेत्रातील दिग्गजांचे फोटो शेअर करत आहेत. एका युजरने हा इम्रान खान तेंडुलकर? की तेंडुलकर इम्रान खान? असा प्रश्न विचारला आहे.

एकाने ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील जेठालाल यांचा फोटो ट्विट करुन ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथचा फोटो असल्याचं कॅप्शन दिले आहे.
तर पाकचे पंतप्रधान म्हणून सचिनचा फोटो वापरत असतील तर सर डॉन ब्रॅडमन म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचे एका युजरने म्हंटले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

सावधान ! पाय दुखणे हा असू शकतो हार्ट अ‍ॅटॅकचा संकेत

मन आणि शरीराच्या आरोग्यासाठी थोडा वेळ काढलाच पाहिजे

सावधान ! मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकतो ‘ब्रेन कँन्सर’

लो-इम्पॅक्ट एक्झरसाइज करा…आणि कॅलरीज होतील बर्न