काश्मीरच्या मुद्यावरून कोणत्याच देशाची साथ न मिळाल्याने PM इम्रान खानची ट्विटरवरून ‘दया’याचना !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काश्मीरप्रश्नी कोणत्याही देशांनी साथ न दिल्याने पाकची खळबळ अद्यापही सुरुच असून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विटरद्वारे मदतीची याचना केली आहे. पाकिस्तानचा हा प्रपोगंडा सुरु आहे. त्याला कोणीही भीक घालताना दिसत नाही. पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह महमूद कुरैशी सध्या चीन दौऱ्यावर आहेत. त्यांनी चीनकडे जम्मू-काश्मीर प्रश्नावर मदत मागितली मात्र, या ठिकाणी देखील पाकिस्तानच्या हाती निराशा आली.

सगळीकडून निराशा होत असल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे ट्विटवरून याचना करत आहेत. इम्रान खान यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे की, आरएसएसच्या हिंदू वर्चस्ववादाच्या विचारसरणीची आपल्याला भीती वाटतेय. कारण नाझी विचारसणीप्रमाणे असलेल्या संघाच्या विचारसरणीमुळे आज काश्मीरमध्ये संचारबंदीची स्थिती आहे. संघाच्या विचारधारेमुळे भारतातील मुस्लिमांचे दमन होईल आणि शेवटी पाकिस्तानला लक्ष केले जाईल. हा प्रकार म्हणजे हिटलरच्या विचारांची हिंदू आवृत्ती आहे. काश्मीरची डेमोग्राफी बदलण्यासाठी जातीय हिंसाचार केला जात आहे. ज्या प्रमाणे हिटलरच्या नरसंहारावर जगातले देश गप्प राहिले होते त्याप्रमाणे भारताच्या या कृतीवरही जग आज गप्प आहे.

दरम्यान, इम्रान खान यांच्या आरोपानंतर जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सामान्य होत आहे. श्रीनगरमध्ये शनिवारी आणि रविवारी बकरी ईदची खरेदी मोठ्या उत्साहात करण्यात आली. जम्मू काश्मीरमधील लोकांना बकरी ईद परंपरेनुसार आणि उत्साहात साजरा करता यावा यासाठी प्रशासनाकाडून अनेक प्रयत्न केले जात आहेत.

भारताचे अनेक देशांकडून समर्थन
जम्मू-काश्मीर मधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जगातील अनेक देशांनी भारताचे समर्थन केले आहे. भारताच्या या निर्णयाचे समर्थन रशियाने देखील केले आहे. रशियाने स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, जम्मू-काश्मीरला दोन भागात विभागून केंद्रशासित प्रदेश करण्याचा निर्णय घटनेनुसारच घेण्यात आला. तसेच जम्मू-काश्मीर राज्याबाबत दिल्लीने घेतलेल्या निर्णयावरून भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणाव वाढणार नाही असे रशियाने म्हटले आहे.

पाकिस्तानी मीडिया नियामक प्राधिकरणाने प्रसारमाध्यमांना सांगितले आहे की, ईद-उल-अजहाच्या दिवशी पूर्वी ध्वनीमुद्रीत केलेल कार्य़क्रम किंवा विषेश कार्य़क्रमांचे थेट प्रसारण करू नये. जेणे करून आपल्या देशातीलच नव्हे तर काश्मीर मधील मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात.

आरोग्यविषयक वृत्त