‘आमच्याकडे 250-250 ग्रॅमचे अणुबॉम्ब’, पुन्हा एकदा पाक मंत्र्यानं करून घेतलं स्वतःचं ‘हसू’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांनी पुन्हा एकदा स्वता:चीच थट्टा करुन घेती आहे. जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचे मंत्री अनेक बेताल वक्तव्य करत आहेत. असे वक्तव्य करुन शेख रशीद यांनी पुन्हा एकदा स्वता:ची थट्ट करुन घेतली. ते म्हणाले की, पाकिस्तानकडे 125-250 ग्रॅमचे परमाणू बॉम्ब आहेत जे एखाद्या जागेला लक्ष करु शकतात. त्यानंतर त्यांना अणवस्त्र हल्ल्याची धमकी देखील दिली. त्यांच्या या विधानानंतर त्यांची थट्टा उडवली जात आहे.

या आधी पाकचे रेल्वे मंत्री म्हणाले होते की भारताने दोन राजकीय चूका केल्या आहेत. ते म्हणाले जर भारताने अणवस्त्राचे परिक्षण केले नसते तर पाकिस्तानने देखील केले नसते. याशिवाय त्यांनी आणखी दुसरी चूक केली, 370 कलम रद्द केले, ही मोदी सरकारची मोठी चूक आहे. त्यांना वाटते की काश्मीरी त्यांची स्वतंत्र्याची लढाई सोडून देतील. आता काश्मीरचा मुद्दा संपूर्ण जगात ज्वलंत मुद्दा बनला आहे.

आता ते म्हणाले की, आमच्याकडे अणवस्त्र हल्ल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, आमच्याकडे स्मार्ट बॉम्ब आहे. जर कोणी पाकिस्तानच्या सीमेकडे कूच करेल तर आमच्याकडे स्मार्ट बॉम्ब आहे, हे बॉम्ब जेथे शस्त्रास्त्र असतील त्याला निशाणा बनवतील.

रशीद यांनी केलेला दावा ऐकूण पत्रकार देखील आश्चर्यचकित झाले. त्यानंतर त्यांना अणू हल्ल्याच्या धमकी बद्दल विचारले असताना ते म्हणाले की, आम्ही मूक गिळून बसलेलो नाही. काश्मीरमध्ये अत्याचार होत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –