भारताच्या ‘गंभीर’ इशार्‍यामुळं पाकवर दबाव ! जबरदस्तीनं धर्मांतर केलेल्या शीख युवतीला केलं परत, 8 जणांना अटक

दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानमध्ये सध्या एका शीख युवतीच्या धर्मपरिवर्तनाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजत आहे. आता या प्रकरणात या मुलीची सुटका करण्यात आली असून तिला आपल्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या मुलीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यामध्ये तिने आपल्या मर्जीने मुस्लिम धर्म स्वीकारल्याचे म्हटले होते. मात्र मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानुसार यासाठी जबरदस्ती करण्यात आल्याचे तसेच धमकावण्यात आल्याचे म्हटले होते. पाकिस्तानमधील ननकाना साहिब भागात हि घटना घडली होती.

त्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना पत्र लिहून आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर आपल्या मुलीची सुटका न झाल्यास आम्ही संपूर्ण कुटुंब आत्मदहन करणार असल्याचे देखील काल मुलीच्या कुटुंबीयांनी म्हटले होते. त्यानंतर इम्रान खान यांनी तात्काळ या आरोपींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर या प्रकरणी 8 जणांना अटक केली असून या मुलीला तिच्या वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकरणात अमरिंदर सिंह यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना देखील पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांसमोर हे प्रकरण नेण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे पाकिस्तानवर दबाव पडून लवकर याचा तपास करण्यात आला.

दरम्यान, या मुलीला तिच्या वडिलांकडे स्वाधीन करण्यात आल्यानंतर आता तिच्याकडून सर्व खरी माहिती तसेच नक्की हे प्रकरण काय आहे याची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

आरोग्यविषयक वृत्त –