पाकमंत्र्याचे डोक फिरलं म्हणे ‘आर्मी कॅप’ घालून खेळणाऱ्या संघावर कारवाई करा !

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईनभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा तिसरा सामना काल पार पडला.  त्यात भारतीय संघाने भारतीय आर्मीची कॅप घालून पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना आदराजंली वाहिली. तसंच या सामन्याचे मानधन शहीद जवानांच्या कुटुंबांसाठी देण्याचा निर्णय भारतीय संघाने घेतला होता. या सामन्यात त्यांनी भारतीय आर्मीची कॅप घातली होती. त्यावरून भारतीय क्रिकेट संघावर कारवाई करण्याची मागणमी पाकिस्तानने केली आहे.

पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद खान यांनी, भारतीय क्रिकेट संघावर कारवाई करण्याची मागणी आयसीसीकडे केली आहे. पुलवामा हल्ल्यात हौतात्म्य स्विकारलेल्या जवानांबद्दल आदर दाखवण्यासाठी भारतीय संघ ‘आर्मी कॅप’ घालून मैदानात उतरला. मात्र भारतीय संघाचं हे काम पाहून पाकिस्तानच्या पोटात दुखलं असावं. खेळाचं राजकारण केल्याप्रकरणी भारतीय संघावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी फवाद खान यांनी केली आहे.

आर्मी कॅप घालून भारतीय संघाने क्रिकेटमध्ये राजकारण घुसवण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याबद्दल आयसीसीकडे तक्रार दाखल करावी. जर भारतीय संघाने आर्मी कॅप घालणं थांबवलं नाही, तर पाकिस्तान संघही विश्वचषकात, काश्मीरमध्ये भारतीय सैन्याकडून होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधात काळ्या फिती लावून मैदानात उतरेल, असं फवाद चौधरी यांनी म्हटलं. ते पाकिस्तानमधील डॉन वृत्तपत्राशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी अशी मागणी केली आहे.

दरम्यान, पुलवामा हल्ल्यात ४० भारतीय जवान शहीद झाले. त्यानंतर देशात पाकिस्तान विरोधात संताप व्यक्त होत होता. विश्वचषकात भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी मागणी जोर धरत होती. त्यानंतर आता पाकिस्तानची ही मागणी ऐकूण पाकिस्तानची लाचारीच समजून येत आहे.

ह्याहि बातम्या वाचा

 

मी भाजपच्या लावारीस पोरांनी केलेल्या ट्रोलींगला भीक घालत नाही

मी राष्ट्रवादीच्या देखील संपर्कात आहे

लोकसभेबाबत मला जो निर्णय घ्यायचा आहे तो मी नंतर जाहीर करेलच : राज ठाकरे

विखे आणि महाजन एकाच हेलिकॉप्टरमधून मुंबईला रवाना

OMG ! रिलीजच्या दुसऱ्या दिवशी अमिताभ यांचा ‘बदला’ झाला लिक