भारताचा धसका ! भारतीय समजून आपल्याच पायलटला केली मारहाण, पाकच्या पायलटचा मृत्यू 

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ला करत भारताने एअर स्ट्राईक करत दहशतवादी स्थळ उध्वस्त केली. यानंतर २७ फेब्रुवारीला पाकिस्तानची ३ विमाने भारताच्या हद्दीत घुसली. जम्मू आणि काश्मीरमधील पुंछ, नौशेरा सेक्टरमधील भारतीय हद्दीत घुसलेली विमाने भारतीय हवाई दलाने चोख प्रत्युत्तर देत पिटाळून लावली. पाकिस्तानी हवाई दलाचे F-16 हे विमान भारताने पाडले. यानंतर त्यातून सुखरुप वाचलेल्या पायलटला मात्र पाकिस्तानी लोकांनी मारहाण केली. यात त्या पाकिस्तानच्या पायलटचा मृत्यू झाला.

भारताने पाडलेल्या पाकिस्तानी हवाई दलाच्या F-16 या विमानात शाहजुद्दीन हा पायलट होता. F-16 विमान पाडल्यानंतर पाकिस्तानी पायलट शाहजुद्दीन हा पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुखरूप उतरला होता. त्याने आपला जीव वाचवला होता. परंतु यानंतर मात्र पाकिस्तानी लोकांनी त्याला भारतीय पायलट समजून जबरी मारहाण केली. यात तो पायलट जखमी झाला. यानंतर सदर पायलट हा आपल्याच देशाच्या हवाई दलाचा पायलट आहे हे लक्षात आल्यानंतर शाहजुद्दीन याला त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले. पंरतु यावेळी उपचारादरम्यान शाहजुद्दीनचा मृत्यू झाला.

पाकिस्तानी लोकांना जेव्हा लक्षात आले की, आपण आपल्या देशाच्या हवाई दलाच्या पायलटला मारले आहे तेव्हा या घटनेनंतर परिसरातील लोकांना आपल्याच कृत्याने धक्का बसला.