इम्रान खानच्या जिद्दीमुळं युवक पोहचू शकला नाही वडिलांच्या अत्यंसंस्काराला, चीनमध्येच अडकला पाकिस्तानी विद्यार्थी

वुहान : वृत्त संस्था  – चीनचे शहर वुहानमध्ये अडकलेला एक विद्यार्थी पंतप्रधान इम्रान खान यांच्या जिद्दीमुळे आपल्या वडीलांच्या अंत्यसंस्कारातही सहभगी होऊ शकला नाही. या विद्यार्थ्याच्या वडीलांना आपल्या मुलाला जवळ घेण्याची शेवटची इच्छा होती. परंतु चीनमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे विद्यार्थ्याला चीनमधून पाकिस्तानात जाऊ दिले नाही. विद्यार्थ्याने या प्रकरणात इम्रान सरकारलाही विनंती केली. परंतु कोणीही त्याचे ऐकले नाही.

चीनच्या वुहान शहरात पीएचडी करणारा हसन गुरुवारी शेवटचा आपल्या वडीलांशी बोलला होता. हसनच्या 80 वर्षांच्या वडीलांनी त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु दुसर्‍याच दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. वडीलांच्या मृत्यूनंतर कम्प्यूटर आर्किटेक्चरमध्ये पीएचडी करणारा हसन म्हणाला, यावेळी माझ्या कुटुंबाला माझी गरज आहे. माझी आई अजूनही माझी वाट बघत आहे.

चीनमध्ये अडकलेल्या पाकिस्तानी विद्यार्थ्यांचे कुटुंबिय त्यांना परत आणण्यासाठी सरकारवर दबाव आणत आहेत. परंतु सरकार ऐकण्यास तयार नाही. सरकारचे म्हणणे आहे की, त्यांना येथे आणणे खुप धोकादायक आहे. याशिवाय सरकारचे म्हणणे आहे की चीनमध्ये त्यांना इथल्यापेक्षा जास्त आरोग्य सुविधा मिळत आहेत. यावरून पाकमधील विरोधी पक्षांनीही सरकारवर टीका केली आहे. उशीर न करता सरकारने मुलांना ताबडतोब आणावे, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

पाकिस्तानात टेस्ट किट नाहीत
पाकिस्तानकडे वर्ल्ड क्लास मेडिकल सुविधांचा अभाव आहे. कोरोना व्हायरस टेस्टचे किटसुद्धा नाहीत. पाकिस्तानने जापानकडून किट खरेदी करण्याचा करार केला आहे. परंतु चीनला जाणारी विमाने रद्द झाल्याने किट येण्यास उशीर होत आहे.