Palghar Crime | सामुहिक बलात्काराने पालघर जिल्हा हादरला; 16 वर्षीय युवतीवर आठ जणांकडून अत्याचार

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – पालघर जिल्ह्यात सातपाटी येथे एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर आठ नराधमांनी सामुहिक बलात्कार (Palghar Crime) केला आहे. याप्रकरणी आठ जणांच्या विरोधात सातपाटी पोलीस ठाण्यात (Palghar Crime) गुन्हा नोंद केला गेला असून, आठही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

एका तरुणाने त्याच्या साथीदारांसोबत आपल्याच मैत्रिणीवर हा बलात्कार केला आहे. ही घटना 16 आणि 17 डिसेंबरच्या मध्यरात्री घडली. मुख्य आरोपीने आधी एका निर्जन बंगल्यात अल्पवयीन मुलीला बोलावून तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर तिला समुद्र किनारी नेऊन तिच्यावर आठ जणांनी सामुहिक बलात्कार (Palghar Minor Girl Rape Case) केला. पिडीत अल्पवयीन मुलीने लेखी तक्रार देत पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पिडीतेच्या तक्रारीवर पोलिसांनी आठही अरोपींना अटक करुन त्यांच्यावर भा. द. वि. 376 (डी), 366 (अ), 341, 342, 323 आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असून, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 डिसेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास पीडितेच्या वडिलांनी आपली मुलगी काल रात्रीपासून घरातून बेपत्ता असल्याची तक्रार सातपाटी पोलीस ठाण्यात नोंदवली होती. त्यानंतर अवघ्या काही तासांत पोलिसांना मुलीचा शोध घेण्यात यश आले.
पोलिसांनी या अल्पवयीन मुलीला हरणवाडी परिसरातून ताब्यात घेतले.
पीडितेच्या मित्राने तिला माहीम परिसरातील पानेरी येथे बंद असलेल्या एका बंगल्यामध्ये बोलावून घेतले होते.
येथेच हा सर्व प्रकार घडला.

 

 

Web Title :- Palghar Crime | shocking 16 year old village girl gang raped for 12 hours
read heart wrenching crime story of maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा