Palkhi Sohala 2023 | पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Palkhi Sohala 2023 | आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी (Alandi Wari Palkhi Sohala) पाणी, शौचालय, वाहतूक व्यवस्था, रस्ते, आरोग्य सुविधा आदी सर्व सोयी सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्यासह पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (IAS Dr. Rajesh Deshmukh) यांनी दिले. (Palkhi Sohala 2023)

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान (Shri Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala 2023) आणि संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान पालखी सोहळ्याबाबत (Saint Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala 2023) पूर्वतयारी आढावा बैठक डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल (IPS Ankit Goyal) , पुणे शहर विशेष शाखेचे पोलीस उपयुक्त ए. राजा (IPS A. Raja), पिंपरी चिंचवड परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त विवेक पाटील (DCP Vivek Patil), पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ (Jitendra Wagh PCMC), निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती कदम (RDC Jyoti Kadam), श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त ॲड. विकास ढगे-पाटील (Adv Vikas Dhage Patil), श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. माणिक मोरे (HBP Manik More) आदी उपस्थित होते. (Palkhi Sohala 2023)

यंदा दरवर्षीपेक्षा एक महिना अगोदर पालखी सोहळा होत आहे त्यामुळे सर्व विभागांनी संपूर्ण तयारी गतीने करावी, असे सांगून डॉ. देशमुख म्हणाले, यंदा भारतीय हवामानशास्त्र विभागाने अल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पुणे Pune Municipal Corporation (PMC), पिंपरी चिंचवड मनपा Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), नगरपरिषदा तसेच सर्व स्थानिक यंत्रणांनी पाणीपुरवठ्याबाबत दक्ष रहावे. पालखी जूनमध्ये निघणार असल्याने उष्णतेचा घटकही लक्षात घेणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातील पालखी सोहळा हा महत्त्वाचा आणि ऐतिहासिक सोहळा असून सर्वांच्या सहभागातून शांततेत, आनंदात व सौहार्दात हा सोहळा यशस्वी करू. भाविकांची कोणतीही अडचण होणार नाही यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी पालखी मार्ग, पालखी तळ, विसाव्यांची संयुक्त्त पाहणी केली आहे. पालखी सोहळा प्रमुखांसमवेत समन्वयाने काम सुरू आहे. पाहणी आणि बैठकीत निदर्शनास आलेल्या बाबींच्या अनुषंगाने सर्व संबंधित विभागांनी आपापल्या विभागांकडील कामे तातडीने पूर्ण करून घ्यावीत.

पाणीपुरवठ्याचे टँकर आणि शौचालयांच्या संख्येत गतवर्षीपेक्षा वाढ करण्यात येईल. पालखीला टँकरने पाणीपुरवठा होणाऱ्या सर्व स्रोतांची तपासणी करावी. आवश्यक ती निर्जंतुकीकरणाची औषधे, दवाखान्यांमध्ये औषधे उपलब्ध ठेवावीत. पालखीच्या रस्त्यावर कोठे अतिक्रमणे असल्यास ती तात्काळ काढून टाकण्यात यावीत असे निर्देश त्यांनी दिले.

पोलीस अधीक्षक गोयल म्हणाले, पालखीसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येईल.
पालखी सोहळ्याच्या मार्गावरील वाहतूक वळविण्याबाबत अगोदर पूर्वप्रसिद्धी करण्यात येईल.
पालखी सोहळा व्यवस्थापकांनीही पुरेसे स्वयंसेवक नेमावेत, अशीही सूचना गोयल यांनी केली.

बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी,
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनीक बांधकाम विभागाचे अभियंता, अन्न व औषध प्रशासन,
महावितरण आदी विभागांकडून पूर्वतयारीचा आढावा घेतला.

 

बैठकीस श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान, श्री संत तुकाराम महाराज देवस्थान, श्री संत सोपानदेव महाराज देवस्थान,
श्री संत चांगावटेश्वर महाराज देवस्थान पदाधिकारी, उपविभागांचे प्रांताधिकारी, संबंधित तालुक्यांचे तहसीलदार,
महानगरपालिका, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, आरोग्य विभाग, पोलीस, अग्निशमन विभाग, पशुसंवर्धन विभाग,
परिवहन विभाग, राज्य मार्ग परिवहन महामंडळ आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 

Web Title :-  Palkhi Sohala 2023 | Everyone should work in coordination to make the Palkhi ceremony a success –
Collector Dr. Rajesh Deshmukh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Mundhwa News | मुंढवा-केशवनगरमधील परिस्थिती चिंताजनक?, वरिष्ठ पोलिस निरीक्षक ‘एक्सटेन्शन’च्या ‘जुगाड’मध्ये

Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद 13 वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा !
30 यार्डस् क्रिकेट अ‍ॅकॅडमी, ए.के. स्पोर्टस् अ‍ॅकॅडमी संघांची विजयी कामगिरी

Accident News | लग्नाला जाताना झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू; 5 महिला आणि 2 मुलांचा समावेश

Bhor Lok Nyayalaya | भोर येथे 11 मे रोजी विशेष लोकन्यायालयाचे आयोजन

Chandrakant Patil – Pune News | स्वच्छ भारत अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप – पालकमंत्री चंद्रकांत पाटील