PAN-Aadhaar Linking | इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने दिला इशारा ! 31 मार्चपर्यंत करा ‘हे’ काम अन्यथा डिअ‍ॅक्टिव्ह होईल पॅनकार्ड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PAN-Aadhaar Linking | प्राप्तीकर विभागाने (Income Tax Department) पॅन कार्ड आधारशी लिंक न करणाऱ्या लोकांना इशारा दिला आहे. तुम्ही अद्याप तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले नसेल, तर तुम्ही ते ३१ मार्च २०२३ पर्यंत लिंक करू शकता. या तारखेपर्यंत जे असे करणार नाहीत, त्यांचे पॅन कार्ड १ एप्रिल २०२३ नंतर निष्क्रिय केले जाईल. (PAN-Aadhaar Linking)

 

प्राप्तीकर विभागाने ट्विट करून लोकांना आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्यास सांगितले आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे की, प्राप्तीकर कायदा १९६१ नुसार, सर्व पॅन धारक जे सवलत श्रेणीत येत नाहीत त्यांनी ३१ मार्च २०२३ पूर्वी त्यांचे पॅन आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. (PAN-Aadhaar Linking)

 

पॅन कार्ड आधारशी लिंक करणे का आवश्यक?
देशातील लोकांच्या आर्थिक व्यवहारांची नोंद ठेवण्यासाठी सरकार पॅन कार्ड (PAN Card) चा वापर करते. ते प्राप्तीकर विभागाने जारी करते. हे इलेक्टड्ढॉनिक प्रणालीद्वारे कार्य करते. एखाद्या व्यक्तीची किंवा कंपनीची सर्व कर संबंधित माहिती एकाच पॅन नंबरमध्ये नोंदवली जाते. पॅन हा डेटा साठवण्याचे काम करते. हे कोणत्याही व्यक्तीला फक्त एकदाच दिले जाते. अशावेळी, जर ते निष्क्रिय केले तर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

कस करावे पॅन कार्ड आधारशी कसे लिंक?
तुमचे पॅन कार्ड ऑनलाइन आधारशी लिंक करण्यासाठी, तुम्ही प्रथम प्राप्तीकर ई-फायलिंग वेबसाइटला भेट द्या.
येथे फॉर्ममध्ये पॅन आणि आधार क्रमांक टाकल्यानंतर आधार कार्डनुसार नाव भरावे.
आधार कार्डवर फक्त जन्मतारीख लिहिलेली असेल, तर तुम्हाला बॉक्समध्ये उजवीकडे राईट चिन्ह करा.
त्यानंतर पडताळणी करण्यासाठी, इमेजमध्ये दिलेला कॅप्चा कोड टाका.
यानंतर Link Aadhaar चा पर्याय येईल. त्यावर क्लिक करा.
ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले जाईल.

 

Web Title :- PAN-Aadhaar Linking | pan card not linked to aadhaar will be deactivated from first april how to link pan card to aadhaar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

NCP Leader Ajit Pawar | ‘आपण युध्दात जिंकतो, तहात हरतो’ असं म्हणत अजित पवारांनी दिला मुख्यमंत्र्यांना सल्ला, म्हणाले – ‘मला गनिमी काव्याबद्दल…’

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्याची ओळख पटली

Devendra Fadnavis | चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीनंतर देवेंद्र फडणवीस संतापले, म्हणाले… (व्हिडिओ)