सोलापुरात भाजपला मोठा धक्का, ‘हा’ मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर ?

पंढरपूर/सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील अनेक नेत्यांनी काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातून भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. मात्र विधानसभा निकालानंतर राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (Shivsena) या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना करत सरकार स्थापन केले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

त्यातच आता पंढरपूरचे (Pandharpur) भाजप नेते तथा सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. आज पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad pawar) आणि कल्याणराव काळे एकाच मंचावर होते. यावेळी बोलताना कल्याणराव काळे यांनी सांगितले की, आपण यापुढे शरद पवार साहेब जे सांगतील त्या पद्धतीने काम करु असं जाहीर वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर काळे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश जवळपास निश्चित मानले जाऊ लागले आहे.

काळे म्हणाले, मागच्या काळात दुष्काळ आणि आर्थिक मंदीमुळे साखर कारखाने अडचणीत होते. त्यावेळी पवार साहेबांनी पंढरपुरच्या तिन्ही साखर कारखान्यांना मोठी मदत केली आहे. पवार साहेबांच्या मदती मुळे आज साखर कारखान्यांचे धुराडे पेटले आहे. आमच्यापण काही चुका झाल्या. मात्र त्यांनी कधीच दुजाभाव केला नाही. शेतकऱ्यांची कारखानदारीनीट चालावी अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आज पंढरपुरातील विठ्ठल, चंद्रभागा आणि भीमा हे कारखाने सुरु झाल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शरद पवार यांनी आपल्या भाषणात, कल्याणराव काळे यांना विश्वासात घेऊनच विठ्ठल कारखान्याची आर्थिक घडी नीट बसवू असे सांगितल्याने तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.