Pandharpur By Election Result : भाजपचे समाधान अवताडेंची 18 व्या फेरीअखेर आघाडी कायम, राष्ट्रवादीचे भगीरथ भालके पिछाडीवर

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. पोटनिवडणुकीसाठी 17 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. आज मतमोजणी होत आहे. 18 व्या फेरी अखेर समाधान अवताडे यांनी आघाडी घेतली आहे. तर राष्ट्रवादीचे भालके पिछाडीवर पडले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

अठराव्या फेरीअखेर भाजपचे समाधान अवताडे यांनी मतांची आघाडी कायम ठेवली आहे. त्यांना 52450 तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना 51384 मते मिळाली आहेत. समाधान अवताडे 1066 मतांनी आघाडीवर आहेत. 17 व्या फेरीअखेर समाधान अवताडे 755 मतांनी आघडीवर होते. दोन्ही उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर पहायला मिळत आहे. सुरवातीच्या काही फेऱ्यांमध्ये भालके आघाडीवर होते. मात्र, त्यानंतर अवताडे यांनी आघाडी घेतली असून 18 व्या फेरीपर्यंत त्यांनी आघाडी कायम ठेवली आहे.

पंढरपूर-मंगळवेढ्याचे राष्ट्रीवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली. या ठिकाणी महाविकास आघाडीकडून भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर भाजपने समाधान अवताडे यांना उमेदवारी दिली आहे. सहानभुतीच्या लाटेत भाजपने राष्ट्रवादीला तगडे आव्हान दिले आहे. एकूण 19 उमेदवार आपले नशीब आजमावत असले तरी खरी लढत भालके-अवताडे यांच्यामध्ये होणार आहे.

READ ALSO

Pandharpur By Election Result : भाजपचे समाधान अवताडेंची मुसंडी, राष्ट्रवादीचे भगीरथ भालके पिछाडीवर

पंढरपूर पोटनिवडणूक : ट्रेंड बदलला ! भाजपच्या समाधान आवताडेंनी घेतली मोठी आघाडी

IMP NEWS – Gold Price Today : आठवडाभरात 3400 रुपयांनी स्वस्त झाले सोने, जाणून घ्या पुढे आणखी स्वस्त होईल की, येईल तेजी…?