धुळे : चोवीस तासानंतरही दुथडी भरून वाहतेय पांझरा नदी ; प्रशासनाचे सतर्कतेचे आदेश

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – तालुक्यात साक्री, पिंपळनेर परिसरात सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पांझरा नदीला पूर आला असून धरणात सतत पाणी वाढत असल्यामुळे अक्कलपाडा धरणातून सोडण्यात येणारा प्रवाह वाढविण्यात येणार असून, एकूण ४२००० क्यूसेस पाणी प्रवाह पांझरा नदीत सोडण्यात येणार आहे. म्हणून नदीकाठाला लागून असलेल्या नागरिकांनी सतर्क राहावे, पूर पाहण्यासाठी नागरिकांनी जाऊ नये, लहान मुले, विद्यार्थी यांना नदी पात्राजवळ जाऊ देऊ नये. मदतकार्य करणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांना सहकार्य करावे, असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले.
Panzara
पांझरा नदीला आलेला पूर आणि पुराच्या पाण्याची होणारी वाढ पाहता नागरिकांनी सतर्क राहावे. नदी, नाला काठ, जलाशयाजवळ जावू नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून केले जात आहे.

प्रशासनाच्या वतीने उद्या सुट्टी जाहिर दुसऱ्या दिवशीही शाळा, कॉलेज सुट्टी देण्यात आली आहे. शहरी व ग्रामीण साक्री तालुक्यात सुट्टी जाहिर केल्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी मनिष पवार यांनी दिले आहे.

आरोग्यविषयक वृत्त