Pankaja Munde | भाजपमध्ये मोठे फेरबदल, विनोद तावडे, पंकजा मुंडेंवर मोठी जबाबदारी; पंकजा मुंडेंची नाराजी मावळणार?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (BJP National President J.P. Nadda) यांनी एक यादी जाहीर केली आहे. आगामी निवडणुकांच्या (Election) तोंडावर विविध राज्यांमध्ये प्रभारी (In-Charge) आणि सहप्रभारीची (Co-in-Charge) घोषणा करण्यात आली आहे. यात पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याही नावाचा समावेश आहे. मागील काही दिवसांपासून पंकजा मुंडे (Pankaja Munde) नाराज असल्याचे वृत्त वारंवार समोर येत आहे. तसेच त्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

 

जेपी नड्डा यांनी केलेल्या निवडीनुसार, पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना मध्यप्रदेशच्या (Madhya Pradesh) सहप्रभारी करण्यात आलं आहे. तर विजया रहाटकर (Vijaya Rahatkar) यांना राजस्थान (Rajasthan) सहप्रभारी करण्यात आले आहे. भाजपकडून विनोद तावडे (Vinod Tawde) यांना बिहार (Bihar) तर प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांना केरळ (Kerala) राज्याचा प्रभारी करण्यात आलं आहे.

 

भाजपने राज्यांसाठी नवीन नियुक्ती केलेल्या प्रभारींमध्ये लक्ष्मीकांत वाजपेयी (Laxmikant Vajpayee) यांना झारखंडची (Jharkhand) जबाबदारी देण्यात आली आहे. बिप्लब कुमार दुबे (Biplab Kumar Dubey) यांना हरियाणाचे (Haryana) प्रभारी बनवण्यात आले आहे. तर राधामोहन अग्रवाल (Radhamohan Aggarwal) यांना केरळचे सहप्रभारी बनवण्यात आले आहे. मुरलीधर राव (Muralidhar Rao) यांना मध्य प्रदेशचे प्रभारी बनवण्यात आले आहे. मध्य प्रदेशात पंकजा मुंडे आणि डॉ. रमाशंकर कथेरिया (Dr. Ramashankar Katheria) यांना सहप्रभारी बनवण्यात आले आहे.

आमदार विजय रुपानी (MLA Vijay Rupani) यांना पंजाबचे (Punjab)
प्रभारी तर डॉ. नरेंद्र सिंह रैना (Dr. Narendra Singh Raina) यांना सहप्रभारी बनवण्यात आले आहे.
दादरा आणि नगर हवेली (Dadra and Nagar Haveli) आणि दम आणि दीवचे (Daman and Diu)
प्रभारी खासदार विनाडे सोनकर (MP Vinade Sonkar) यांना करण्यात आले आहे.
खासदार राधामोहन अग्रवाल (MP Radha Mohan Aggarwal) यांची लक्षद्वीपचे (Lakshadweep)
प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तरुण चुघ (Tarun Chugh) यांना तेलंगणाचे (Telangana) प्रभारी बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर अरविंद मेनन (Arvind Menon) यांची तेलंगणाचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अरुण सिंह (Arun Singh) यांना राजस्थानचे प्रभारी खासदार केले आहे. राजस्थानमध्ये विजया रहाटकर सह प्रभारी असतील. खासदार महेश शर्मा (MP Mahesh Sharma) यांना त्रिपुराचे (Tripura) प्रभारी बनवण्यात आले आहे.

 

Web Title :- Pankaja Mundhe | bjp has made vinod tawde in charge of bihar while pankaja mundhe appointed in mp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune-Solapur Road Accident | दुर्दैवी ! पुणे-सोलापूर रस्त्यावर ट्रकची दुचाकीस्वार मयलेकींना धडक, महिलेचा मृत्यू तर मुलगी गंभीर जखमी

 

MP Navneet Rana | गृहमंत्री फडणवीस खा. नवनीत राणांवर कारवाईचे आदेश देणार का? NCP चा सवाल

 

Use Basil For Natural Face Mask | इम्युनिटीच नव्हे, त्वचेसाठी सुद्धा जबरदस्त आहे तुळस, जाणून घ्या तुळशीचे 5 DIY हॅक्स