कॉ. पानसरे हत्या प्रकरण : शरद कळसकरने मोबाईल आणि डायरी शेतात जाळली, कळसकर एसआयटीसह औरंगाबादेत

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी शरद कळसकरने त्याच्या शेतात घराच्या पाठीमागे मोबाईल आणि डायरी जाळल्याची माहिती समोर आली आहे. विशेष तपास पथक शरद कळसकरला घेऊन औरंगाबादला आले. पथकाने त्याला घेऊन त्याच्या शेताची पाहणी केली आहे. आर्धा ते पाऊण तास गुरुवारी हे पथक त्याच्या गावी केसापूरी येथे होते.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या एसआयटीने शरद कळसकरला तपास यंत्रणांकडून ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास करण्यासाठी एसआयटीने शरद कळसकरला बुधवारी सायंकाळी औऱंगाबादला आणण्यात आले. त्यानंतर एसआयटीचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली सात ते आठ जणांच्या पथक त्याला गुरुवारी त्याच्या गावी केसापूरी दुपारी दीडच्या सुमासार दाखल झाले. त्यावेळी पथकाने कळसकरच्या घरी आणि शेतात जाऊन सुमारे अर्धा तास पाहणी केली.

पुरावे, मोबाईल आणि डायरी जाळली

शरद कळसकर मोबाईल वापरत नव्हता असा दावा कुटुंबियांकडून केला जात होता. मात्र त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने या प्रकरणाशी संबंधित पुरावे, मोबाईल आणि डायरी त्याने शेतातच आपल्या घराच्या पाठीमागे जाळल्याचे समोर आले. त्यानंतर पथकाने काल त्याच्या शेतात या मोबाईलचे व डायरीचे अवशेष शोधण्याचा प्रयत्न केला. तर त्यांना तेथे काय मिळाले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र तपास पथक पंचनामा केल्यानंतर पुन्हा त्याच्या गावी आले आणि त्यांनी कळसकरच्या आई वडिलांची व नातेवाईकांची भेट घेतल्याचेही सुत्रांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो 

एक रामबाण उपाय जो तुम्हाला म्हातारपणीही देतो तारूण्याचा अनुभव 

“केळी” आरोग्यासाठी उपयुक्त 

बाहेर जेवण करणे ठरू शकते मधुमेहाला निमंत्रण