पतंजलीनं लॉन्च केलं जबरदस्त SIM, ज्याच्यापुढं Jio देखील झालं ‘फेल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पतंजली आयुर्वेद लिमिटेड ही एक भारतीय ग्राहक वस्तू कंपनी असून मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आणि मुख्यालय उत्तराखंड येथील हरिद्वार औद्योगिक क्षेत्रात आहे. तर नोंदणीकृत कार्यालय दिल्लीत असून कंपनी खनिज आणि हर्बल उत्पादनं तयार करते.

पतंजलीने आपले नवीन सिम बाजारात आणले असून ते प्रत्येक टेलिकॉम कंपनीला डोकेदुखी ठरणार आहे. जाणून घेऊया सिमची योजना काय आहे आणि किती रुपये द्यावे लागतील. बाबा रामदेव यांनी पतंजलीचे प्रत्येक उत्पादन काढले असून त्यांनी बीएसएनएलशी संपर्क साधून पतंजलीचे नवीन सिम लाँच केले आहे. त्याच्या योजना खालीलप्रमाणे आहे.

१ महिन्यासाठी तुम्हाला केवळ १४४ रुपये द्यावे लागतील, ज्यामध्ये दररोज अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 2GB डेटा आणि १०० एसएमएस मिळतील. जर तुम्हाला यापेक्षा मोठी योजना घ्यायची असेल तर तुम्हाला ७९२ रुपये द्यावे लागतील ज्यामध्ये तुम्हाला ६ महिन्यांसाठी अमर्यादित व्हॉईस कॉल 2GB दररोज आणि १०० मेसेज मिळतील. १ वर्षाची योजना घ्यायची असेल तर तुम्हाला १५८४ द्यावे लागतील, ज्यात तुम्हाला अमर्यादित व्हॉईस कॉल आणि 2GB दररोज १०० एसएमएस मिळतील.

पतंजलीची ही योजना सब-टेलिकॉम कंपनीला टक्कर देणार आहे. कारण सर्व टेलिकॉम कंपन्यांनी त्यांचे रिचार्ज महाग केले असताना पतंजली याचाच फायदा घेऊ शकते.