Panvel MNS | पनवेलमध्ये मनसेला मोठे खिंडार, माजी जिल्हाध्यक्षांसह 65 जण शिंदे गटात

पनवेल : पोलीसनामा ऑनलाइन – Panvel MNS | एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भाजपसोबत (BJP) सरकार स्थापन केल्यानंतर शिंदे गटात (Shinde Group) जोरदार इन्कमिंग सुरु झाले आहे. एकीकडे शिवसेनेचे आमदार (Shivsena MLA), खासदार (MP), पदाधिकारी शिंदे गटात दाखल होत आहेत. तर आता मनसेचे नेते देखील शिंदे गटात दाखल होत आहेत. पनवेल, उरण, खारघरमध्ये मनसेला (Panvel MNS) खिंडार पडले आहे. माजी जिल्हाध्यक्षांसह 65 जणांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

 

पनवेल, उरण, खारघरमध्ये मनसेचे (Panvel MNS) माजी जिल्हाध्यक्ष अतुल भगत (Atul Bhagat) यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. अतुल भगत हे मागील आठ वर्षापासून जिल्हाध्यक्ष होते. सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अतुल भगत यांच्यासह माजी पदाधिकारी यांच्यासह 65 जणांनी मनसेतून शिंदे गटात प्रवेश केला.

 

मनसे मधील अंतर्गत धुसफूस असल्याचे कारण देत अतुल भगत यांनी शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे सांगितले.
उप तालुकाध्यक्ष आणि इतर अनेक पदाधिकारी यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
नुकतेच मनसे नेते अमित ठाकरे (MNS Leader Amit Thackeray) यांनी नवी मुंबईसह रायगडचा दौरा केला होता.
अमित ठाकरे दौरा करुन गेल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
आता या प्रवेशावरुन शिंदे गट आणि मनसेमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.

 

Web Title : –  Panvel MNS | mns 65 workers including the former district president have joined the shinde group in panvel

 

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा