Parambir Singh | अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे परमबीर सिंह यांचं निलंबन रद्द होणार?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप (Corruption Allegation) करणारे आणि अँटिलिया स्फोटक प्रकरण (Antilia Blast Case), मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील (Mansukh Hiren Murder Case) संशयित आणि जवळपास 5 वसुलीच्या प्रकरणांमध्ये आरोपी असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त (Mumbai Former CP) परमबीर सिंह (Parambir Singh) यांचे निलंबन रद्द होऊ शकतं ? असं बोललं जात आहे. महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra) परमबीर सिंह (Parambir Singh) यांना डिसेंबर 2021 मध्ये ऑल इंडिया सर्विसेस रुल्स ॲक्ट 1969 (All India Services Rules Act 1969) अंतर्गत निलंबित (Suspended) केलं होतं.

 

एकामागोमाग गंभीर आरोपानंतर परमबीर सिंह (Parambir Singh) हे काही दिवस ड्युटीवर गैरहजर राहिल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले होते. त्यांचे निलंबन होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. अशातच सरकारनं त्यांच्या निलंबनाचं कारण उघड करण्यासाठी अद्याप चौकशीसाठी चौकशी अधिकाऱ्यांची (Investigating Officers) नेमणूक केलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानुसार, भारतातील कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला निलंबित केल्यानंतर त्या राज्याच्या सरकारनं चौकशी अधिकाऱ्यामार्फत चौकशी करुन 6 महिन्यांत अहवाल द्यावा लागतो.

गृहविभागाच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जनरल ॲडमिनिस्ट्रेशन विभागाने (Department of General Administration) सेवानिवृत्त ब्युरो क्रेटची यादी चौकशीसाठी गृह विभागाकडे पाठवली होती. परंतु गृह विभागाने तो प्रस्ताव फेटाळला. याशिवाय जर सरकारने चौकशी अधिकारी नेमून निलंबनाच्या कारणाचा अहवाल तयार केला नाही. तर त्यांना सिंह यांचं निलंबन मागे घ्यावे लागू शकतं, असं सूत्रांनी सांगितले. परमबीर सिंह हे 1988 च्या बॅचचे आयपीएस (IPS) अधिकारी असून ते या वर्षी 30 जून रोजी सेवानिवृत्त (Retired) होत आहेत.

 

परमबीर सिंह यांच्यावर पाच गुन्हे दाखल असून त्यापैकी एक गोरेगाव पोलीस ठाण्यात (Goregaon Police Station) वसुलीचा गुन्हा (FIR) दाखल आहे.
याचा तपास मुंबई गुन्हे शाखा (Mumbai Crime Branch) करत आहेत.
या प्रकरणात त्यांचा जबाब नोंदवण्यात आला असून आरोपपत्रही (Charge Sheet) दाखल करण्यात आले आहे.

 

Web Title :- Parambir Singh | can suspension of former mumbai police commissioner parambir singh may be revoked

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा