PM Narendra Modi | राष्ट्रवादी काँग्रेसची मोदींवर टीका; म्हणाले, ‘ज्या राज्यात निवडणूक त्याची उचलायची तळी आणि महाराष्ट्राच्या बदनामीचे धोरण एककल्ली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना काँग्रेसवर (Congress) टीका केली. ते म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या लाटेत (Corona First Wave) लॉकडाऊन (Lockdown) लावला होता. त्यावेळी मुंबईत स्थलांतरित मजुरांना महाराष्ट्रातील काँग्रेसने मोफत तिकिटे देऊन उत्तर प्रदेश, बिहारमध्ये परत जाण्यास प्रवृत्त केले. त्याचा परिणाम म्हणजे त्या राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्ण (Corona Patients) वाढीवर झाला. या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील (Maha Vikas Aghadi Government) नेत्यानी मोदींच्या टीकेला उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाकाळातील काही फोटो काँग्रेस नेत्यांनी शेअर केले आहे तर महाराष्ट्रद्रोही Bjp या हॅशटॅगखाली राष्ट्रवादीने मोदींना (PM Narendra Modi) प्रत्युत्तर दिलंय.

 

सोमवारी लोकसभेत (Lok Sabha) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेसवर टीका केली.
ते म्हणाले, कोरोना काळात दिल्ली सरकारनेही (Delhi Government) मजुरांना ते शहर सोडायला सांगितले.
त्यासाठी बस व्यवस्थाही केली. त्याचा परिणाम पंजाब (Punjab), उत्तराखंडमध्येही (Uttarakhand) पाहायला मिळाला.
तेथे कोरोनाचा संसर्ग (Corona Infection) झपाट्याने वाढल्याचे सांगतानाच मोदींनी महाराष्ट्रालाही कोरोनाचा (Maharashtra Corona) प्रसार होण्यास जबाबदार धरले.
त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते चांगलेच संतापले आहेत.
मोदींचे भाषण झाल्यानंतर ट्विटरवर महाराष्ट्रद्रोही bjp हा हॅशटॅग सुरू झाला आहे.
या हॅशटॅगने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही राष्ट्रवादीच्या अकाऊंवरील एक ट्विट रिट्विट केलं आहे.

 

त्यामध्ये, राष्ट्रवादीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर (BJP) टीका केली आहे. ज्या राज्यात निवडणूक त्याची उचलायची तळी आणि महाराष्ट्राच्या (Maharashtra) बदनामीचे धोरण एककल्ली.
पण, महाराष्ट्राची खोटी बदनामी करून निवडणुका जिंकता येत नाहीत हे लक्षात घ्या आणि संसदेत बोलताना तरी भाजपच्या स्टार प्रचारकाच्या भूमिकेतून बाहेर या , असे म्हंटले असून हे ट्विट जयंत पाटील यांनी शेअर केले आहे.
पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड येथील निवडणुका (Election) असल्याने देशाच्या प्रमुखांनी संसदेत (Parliament) महाराष्ट्राला अवमानजनक आणि चुकीचे विधान करणे शोभत नाही,
अशा स्पष्ट शब्दात राष्ट्रवादीने मोदींच्या विधानांचा निषेध केला आहे.

 

 

Web Title :- PM Narendra Modi | PM narendra modi ncps reply to modi on corona statement of maharashtra in loksabha jayant patil tweet

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा