Parambir Singh | परमबीर सिंह यांना हाय कोर्टाचा दणका; ‘ती’ याचिका फेटाळली

मुंबई : पोलीसनामा आनलाइन –  Parambir Singh | तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिॆह देखील (Parambir Singh) अडचणीत सापडले आहेत. परमबीर यांना आता मुंबई हाय कोर्टाने (Mumbai High Court) दणका दिला आहे. परमबीर यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. महाराष्ट्र सरकारने (State Government) सुरू केलेल्या चौकशीविरोधात परमबीर यांनी मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र ती याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

परमबीर सिंह यांनी आपल्याविरोधात महाराष्ट्र सरकारने (State Government) सुरू केलेल्या 2 प्रकरणातील तपासाविरोधात याचिका दाखल केली होती. त्यात सेवेबाबत नियम आणि भ्रष्टाचाराचे आरोप अशा 2 प्रकरणांचा समावेश आहे. ही याचिका ‘देखभाल करण्यायोग्य नाही’ असं नमूद करत हाय कार्टाने फेटाळली आहे. याविरोधात राज्य सरकारने बाजू मांडताना “या विषयासंदर्भात दाद मागण्यासाठी न्यायालय नसून केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण’ हीच योग्य जागा आहे. कारण परमबीर सिंह यांनी सेवेत असताना केलेल्या काही चुकीच्या गोष्टींविषयी त्यांची सेवांतर्गत चौकशी सुरू आहे, असं मुंबई हाय कोर्टाने (Mumbai High Court) म्हटलं आहे.

नेमकं याचिकेत काय म्हटलं होतं?

राज्यातल्या महत्त्वाच्या कार्यालयांमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचं प्रकरण आपण उघड केल्यामुळेच आपल्याला लक्ष्य करण्यासाठी हे आरोप ठेऊन तपास केला जात आहे.
असा दावा परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी या याचिकेमध्ये केला होता.
1 एप्रिल 2020 आणि 20 एप्रिल 2021 रोजी आपल्या चौकशीचे आदेश देण्यात आले.
मात्र, आपण पत्राद्वारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणीचे आरोप
केल्यानंतरच आपली चौकशी सुरू करण्यात आल्याचं परमबीर यांनी याचिकेत म्हटलं होतं.

 

Web Title : Parambir Singh | parambir singh plea against maharashtra government inquiry rejected by bombay high court

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

BJP Kolhapur | ‘त्या’ चौघांनी कोल्हापुरातून पक्ष संपवायची सुपारी घेतलीय; ‘BJP’ कार्यकर्त्यांकडून पोस्ट व्हायरल

Supreme Court | ‘एससी’, ‘एसटी’च्या बढत्यांसाठी आरक्षण ! 2018 च्या निर्णयाचा फेरविचार नाही, SC ची स्पष्टोक्ती

Nashik News | आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली ! नाशिकमध्ये डेंग्यू, चिकनगुणियाचा प्रादुर्भाव अधिक; डेंग्यूची रुग्णसंख्या 700