Parbhani Police | पोलीस निरीक्षकासोबत वाद, अपमानित झाल्याच्या भावनेतून आत्महत्येचं स्टेटस ठेऊन कर्मचारी गायब, पोलीस दलात खळबळ

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – परभणीतील एका पोलीस (Parbhani Police) कर्माचाऱ्याने आत्महत्या (Suicide) करावी वाटते असे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस (Whatsapp Status) ठेवल्याने आणि नंतर तो कर्मचारी गायब (Missing) झाल्याने परभणी पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षकासोबत कामावरुन वाद झाल्यानंतर अपमानित झाल्याची भावना या कर्मचाऱ्याच्या मनात निर्माण झाली. यानंतर आपल्याला आत्महत्येसारखे पाऊल उचलावं वाटतंय, असं स्टेटस ठेवून पोलीस कर्मचारी गायब झाला आहे. या पोलीस कर्मचाऱ्याचा (Parbhani Police) पोलीस शोध घेत आहेत. हा प्रकार सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडला.

 

पाथरी पोलीस ठाण्यातील (Pathari Police Station) पोलीस कर्मचारी रफिक मुस्ताक अन्सारी (Police Constable Rafiq Mushtaq Ansari) असे गायब झालेल्या पोलिसाचे नाव आहे. अन्सारी हे पोलीस ठाण्यातील गोपनीय शाखेत (Confidential Branch) कार्यरत होते. आज सकाळी साडे दहाच्या सुमारास ते पाथरी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यावेळी पोलीस निरीक्षक गणेश राहीरे (Police Inspector Ganesh Rahire) यांच्यासोबत तिरंगा रॅली (Tiranga Rally) नियुक्ती संदर्भात चर्चा सुरु असताना वाद झाला.

 

यानंतर दुपारी 2.44 वाजेच्या सुमारास अन्सारी यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर, आज रोजी पोलीस निरीक्षक राहिरे साहेब यांनी अपमानित करुन मला खूप वाईट वागणूक दिली आहे. मला खूप वाईट वाटले. आत्महत्या करावे या सारखे पाऊल उचलावे वाटते, असे स्टेटस अपडेट केले. यानंतर ते पोलीस ठाण्यातून बाहेर पडले. स्टेट्स अपडेटनंतर त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र दोन्ही मोबाईल बंद आढळून आले. यामुळे परभणी पोलीस दलात (Parbhani Police) एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलीस निरीक्षक गणेश राहिरे यांनी सांगितले की, मानवत येथील पोलीस बंदोबस्त आवरला की पाथरी येथे बंदोबस्त ठेवायचा आहे.
डायरीवर नोंद घ्या, असे सांगितले. यावर मला लेखी आदेश द्या, असे जमादार म्हणू लागले.
त्यांना आवश्यक तेवढेच काम सांगितले होते. मात्र त्यांना ते आवडले नाही, अशी माहिती राहिरे यांनी दिली.

 

Web Title :- Parbhani Police | insulted by police inspector feels suicidal excited by jamadars status

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | शिंदे-फडणवीस सरकारची वक्रदृष्टी गोरगरीबांच्या जेवणावर? बंद होऊ शकते शिवभोजन थाळी योजना

Pune News | अतिवृष्टी नुकसानीपोटी 3 कोटी 18 लाखांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त

Popular Front of India (PFI) | PFI च्या रडारवर कोण कोण होतं? महाराष्ट्र ATS कडून खुलासा