Patanjali Share | बाबा रामदेव यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 5 वर्षात 5400% दिला रिटर्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Patanjali Share | बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या नेतृत्वाखालील पतंजली फूड्स (Patanjali Foods Share) चे शेअर्स त्यांच्या गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून देत आहेत. रिसर्च फर्म्सही ते विकत घेण्याचा सल्ला देत आहेत. गेल्या काही दिवसांपासून Patanjali Foods च्या Share मध्ये जोरदार तेजी आहे. (Patanjali Share)

 

सोमवारीही तेजीचा कल कायम होता, आज सुरुवातीच्या व्यवहारानंतर, शेअरला अपर सर्किट लागले, Stock 5 टक्क्यांनी वाढून 1,318.95 रुपयांच्या नवीन उच्चांकावर पोहोचला.

 

सतत वाढतेय शेअर्सची किंमत
बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली फूड्स जी पूर्वी रुची सोया (Ruchi Soya) म्हणून ओळखली जात होती, तिच्या शेअर्सच्या किमतीत सातत्याने तेजी दिसत आहे. शुक्रवार, 2 सप्टेंबर रोजी, तिचा शेअर बीएसई (BSE) वर व्यवहार करत रु. 1,266.75 वर पोहोचला होता, मात्र हा शेअर बाजारात (Share Market) व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी 1,261.30 वर बंद झाला होता. (Patanjali Share)

 

5 वर्षात दिला जबरदस्त रिटर्न
पतंजली फूड्सच्या स्टॉकची किंमत दर आठवड्या आणि महिन्याला वाढत आहे. गेल्या आठवड्यात तिचा शेअर 10 टक्क्यांहून जास्त वाढला आहे. तर गेल्या एका महिन्यात शेअर्सच्या किमतीत 12.89 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, गेल्या सहा महिन्यांत त्याची किंमत 53.66 टक्के वाढली आहे.

या शेअरने दोन वर्षांत 105 टक्के रिटर्न दिला आहे. आता गेल्या पाच वर्षात PATANJALI FOODS च्या शेअरनी 5400 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे. रिटर्नबद्दल बोलायचे झाले तर रामदेव बाबाच्या कंपनीने गेल्या पाच वर्षांत 5,400 टक्के रिटर्न दिला आहे. एवढेच नाही तर ज्या गुंतवणूकदारांनी या वर्षी कंपनीच्या FPO मध्ये पैसे गुंतवले असतील, त्यांची गुंतवणूक आता दुप्पट झाली असेल.

 

तज्ज्ञ देत आहेत खरेदीचा सल्ला
बाबा रामदेव यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये झालेली वाढ पाहून रिसर्च फर्म्सही या खरेदीला फायद्याचा सौदा म्हणत आहेत.
पतंजली फूड्सला BUY रेटिंग देत देशांतर्गत रिसर्च फर्म Antique ने त्यांच्या शेअर्ससाठी प्रति शेअर रु. 1725 चे लक्ष्य ठेवले आहे.
कंपनीच्या तज्ञांचे म्हणणे आहे की कंपनीची कामगिरी पुढील आर्थिक वर्षापर्यंत चांगली राहण्याची अपेक्षा आहे आणि ती 22 टक्क्यांपर्यंत महसूल देऊ शकते.

 

रॉकेटच्या वेगाने धावला शेअर
सध्या, बाबा रामदेव यांच्या पतंजली फूड्सचे मार्केट कॅप (PATANJALI FOODS MCap) सुमारे 45,658.41 कोटी रुपये आहे.
त्यांच्या शेअर्सच्या उसळीबद्दल बोलायचे तर, सप्टेंबर 2017 मध्ये त्यांच्या शेअरची किंमत सुमारे 26 रुपये होती.
सप्टेंबर 2020 पर्यंतच्या तीन वर्षांत या शेअरची किंमत 613 रुपयांपर्यंत वाढली आहे.
त्याच वेळी, सोमवार 5 सप्टेंबर रोजी शेअरची किंमत 13.18.95 रुपयांपर्यंत खाली आली आहे.
पतंजली फूड्स ही Edible Oil चे उत्पादन करणारी देशातील आघाडीची कंपनी आहे.

 

Web Title :- Patanjali Share | baba ramdev patanjali foods at new high 5400 percent return in five years

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Arvind Sawant | आधी ‘पटक देंगे’ म्हटलं आणि नंतर अमित शाह मातोश्रीवर आले, शिवसेनेचा पलटवार

 

Diabetes Control Tips | डायबिटीज सोडत नसेल पाठ? तर शुगर कंट्रोल करण्यासाठी जेवणानंतर करा ‘हे’ छोटे काम

 

High Cholesterol | दूध पिण्याने वाढते ट्रायग्लिसराईड का? येथे जाणून घ्या कोलेस्ट्रॉलचे पूर्ण गणित