पाथरी शहराच्या दर्गा परिसरातील हातपंपातून आपोआप पाणी बाहेर पडतंय

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – सध्याच्या पावसाळ्यात पावसाने जमिनीचे पोट भरले असून नद्या व नाले ओसंडून वाहत आहेत. पाथरी शहरातील हजरत सय्यद शाह इस्माईल कादरी ( अब्दाल ) बडी दर्गा शरीफ भागात गेल्या पाच दिवसापासून सतत हात पंपातून पाणी बाहेर पडत आहे. जिल्ह्यासह तालुक्यात पाऊस पडत आहे अशातच नदी नाले ओढे तुडुंब वाहत आहेत पडलेल्या पावसाचा शेत पिकांना मोठा फटका बसला आहे.

कूपनलिका हँड पंपातून पाणी बाहेर पडत आहे. प्रसिद्ध असलेल्या दर्गा परिसरातील हॅन्ड पंपातून पाणी बाहेर पडत असल्याने पाहण्यासाठी नागरिक पोहोचत आहेत. पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकातून कुतुहलाने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. निसर्गाच्या शक्‍तीचा अद्वितीय नमुना पाहायला मिळत असल्याने अनेक जण आनंद लुटत आहेत. हजरत सय्यद शाह इस्माईल कादरी बडी दर्गा येथे उपवासाच्या रमजान महिन्यात बाराव्या उपवासाला संदल आयोजित केला जातो. श्रद्धा ठेवणारे अनेक नागरिक या ठिकाणी दर्ग्याला भेट देतात. सामाजिक एकतेचे प्रतीक म्हणूनही हजरत सय्यद शाह इस्माईल कादरी प्रसिद्ध दर्गा आहे.