रुग्णाचा जीव होता मुठीत तर रुग्णवाहिका वाट पाहत होती उद्घाटनाची

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन – गेली सहा महिने संपूर्ण मुरबाड तालुक्यात कोरोना झपाट्याने पसरत असतांना कोविड रुग्णाच्या तुलनेने रुग्णवाहिका कमी पडत असल्याने रुग्णांनाची हेळसांड होत होती ही समस्या लक्षात घेऊन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते आज एका रुग्णवाहीकेचे लोकार्पण करण्यांत आले.

गेल्या तीन महिन्या पूर्वी शासकीय कोविड सेंटर उदघाटना वेळी रुग्णवाहिका देण्याचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले होते त्या अनुषंगाने आमदारांच्या स्थानीक विकास निधीतून रुग्णवाहिका सेवा लोकार्पण छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले या प्रसंगी नगराध्यक्षा छाया चौधरी, उपनगराध्यक्षा अर्चना विशे, मा. नगराध्यक्ष किसन अनंत कथोरे, मा. नगराध्यक्षा शितल तोंडलीकर, पंचायत समिती सभापती श्रीकांत धुमाळ, पीआय दत्तात्रय बोराडे, झेडपी सदस्य उल्हास बांगर सह मोठ्या प्रमाणात कार्यकते उपस्तीत होते.

कोविड चे वाढते प्रमाण पाहता उद्घाघटनाचा थाट कशासाठी असा मुरबाड कराना प्रश्न पडला असून प्रत्यक्षात मात्र शासकीय रुग्णालयात मिळणाऱ्या असुविधा, कोविड रुग्णांच्या तुलनेने कमी पडत असले बेड, चुकीचे मिळणारे रिपोट, कोविड च्या नावाने येणारे भरमसाठ बिलाने मुरबाड कर त्रस्त झाले असतांना याकडे मात्र दुर्लक्ष केल्याचे समोर येत आहे मागील काही दिवसा पूर्वी मुरबाड शासकीय रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकां कडून दहा हजार घेतल्याचा प्रकार मुरबाड मनसेने उघड किस आणला होता या घटनेला काही दिवस उलटून जाताच मुरबाड जिल्हा परिषद विश्राम ग्रह येथे जनतेच्या सुविधे साठी चालू केलेल्या अँटीजन रॅपिड टेस्ट रुग्णांना टेस्ट न करता एक चिमुकलिची कोणत्याही प्रकारची चाचणी न करता पॉझिटिव्ह रिपोट देऊन धक्काच दिला होता आशा घमभिर बाबींन कडे दुर्लक्ष करत कारवाही होत नसल्याने मुरबाड कराणां मोठा सामना करावा लागत आहे