Patit Pawan Sanghatana | बांग्लादेशी घुसखोर, रोहिंग्यांवर कारवाईसाठी पतित पावन संघटनेचे आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Patit Pawan Sanghatana | फर्ग्युसन कॉलेज रोडसह पुण्यातील विविध ठिकाणी अनधिकृत स्टॉल पदपथावर लावण्याऱ्या परप्रांतीय, बांगलादेशी व रोहिंग्या यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी पतित पावन संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. फर्ग्युसन महाविद्यालयापासून गुडलक चौकापर्यंत मोर्चा काढून अशा घुसखोर व्यावसायिक व रोहिंग्या मुसलमानांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. (Patit Pawan Sanghatana)

 

पतित पावन संघटनेचे प्रांताध्यक्ष सोपानराव देशमुख, प्रांत चिटणीस नितीन सोनटक्के, शहराध्यक्ष श्रीकांत शिळीमकर, भाजपचे प्रदेश प्रवक्ते अली दारुवाला यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले. (Patit Pawan Sanghatana)

 

सोपानराव देशमुख म्हणाले, “पुण्यात फर्ग्युसन रोड, तुळशीबाग, शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता अशा विविध वर्दळीच्या ठिकाणी अनधिकृत स्टॉल पदपथावर परप्रांतीय बांगलादेशी व रोहिंग्या हे स्थानिक पुढारी, प्रशासनातील लोकांना हाताशी धरून त्यांना चिरीमिरी देऊन हे बेकायदेशीर धंदे राजरोजपणे चालवीतात. या ठिकाणी चालताना याचा नाहक त्रास सर्वसामान्य नागरिकाना होतो. याबाबत दोन दिवसापूर्वी पुणे पालिका आयुक्त विक्रमकुमार यांना संघटनेचे शिष्टमंडळाने भेटून निवेदन दिले होते.

 

तात्पुरती कारवाई या लोकांवर होते. परंतु थोडया वेळाने परत ही लोक आपले धंदे राजरोसपणे सुरू करतात. कायदा व सुव्यवस्था सुरळीत रहावी म्हणून या बांगलादेशी रोहीग्यांना आपल्या देशातून हाकलावे व यांचा पुरता बंदोबस्त करावा या मागणीसाठी आज संघटनेच्या वतीने फर्ग्युसन कॉलेज ते गुडलक चौक भव्य मोर्चा काढण्यात आला.

सदर बेकायदेशीर धंदा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा यापेक्षा अधिक उग्र आंदोलन संघटना छेडेल,
असा इशारा प्रांत सरचिटणीस नितिन सोनटक्के यांनी आपल्या भाषणात दिले.
प्रांत अध्यक्ष श्री सोपनराव देशमुख यांनी आपल्या भाषणात पुणेकर नागरिकांनी देखील एकत्र येऊन
या बेकायदेशीर कृत्याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे अशी आशा व्यक्त केली.

 

आदोलनाचे नेत्तृत्व शहर अध्यक्ष श्रीकांत शिळीमकर यांनी केले. या वेळी मनोज नायर, गोकुळ शेलार, पप्पु टेमघरे,
अरविंद परदेशी, विजय गावडे, विश्वास मणेरे, मनोज पवार, विनोद चौधरी, राजु बर्गे, ज्ञानेश्वर साठे,
राहुल पडवळ, सुनिल मराठे आदी उपस्थित होते.

 

Web Title :- Patit Pawan Sanghatana | Agitation by Patit Pawan organization for action against Bangladeshi infiltrators, Rohingyas

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Moolani’s Eye Care Centre | मुलानी आय केअर सेंटरच्या वतीने काचबिंदू जागृतीसाठी सायकल रॅली

Ahmadnagar Crime News | भाऊ-बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना! भावाचा सख्ख्या चुलत बहिणीवर अत्याचार

IND vs AUS | ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक करून विराट कोहलीने केला ‘हा’ विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा फलंदाज