PM नरेंद्र मोदी यांच्या पटणा रॅलीतील बॉम्बस्फोटातील संशयितास अटक

 पटणा : वृत्तसंस्था  – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पटणा रॅलीतील बॉम्बस्फोटातील संशयितास  हैदराबादहून अटक करण्यात आली आहे. अझरुद्दीन ऊर्फ केमिकल अली असे  या संशयित सिमी (SIMI) दहशतवाद्याचे नाव  आहे.  सदर बॉम्बस्फोट 2013 ला पाटणा आणि बोधगया येथे घडवण्यात आले होते. पाटणा आणि बोधगया या दोन घटनांमध्ये सुरक्षा एजन्सी त्याचा शोध घेत होती. दरम्यान यापूर्वीही त्याला अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

17  संशयितांना अटक –

पाटणा आणि बोधगया बॉम्बस्फोट  प्रकरणात आतापर्यंत 17 संशयितांना अटक करण्यात आली आहे. परंतु अझरुद्दीन उर्फ केमिकल अली हा फरार होता. त्याला छत्तीसगड पोलिस आणि एटीएसने हैदराबाद विमानतळावर अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी पासपोर्ट, दोन ड्रायव्हिंग लायसन्स आणि मतदार ओळखपत्र जप्त केले आहे.

बौद्ध भिक्षूंना लक्ष्य करून स्फोट करण्यात आला

ऑक्टोबर 2013 मध्ये नरेंद्र मोदींच्या पाटण्यात झालेल्या बैठकीत स्फोट झाला होता.बिहारमधील बोधगया येथे झालेल्या स्फोटात अनेक तिबेटी भिक्षु आणि पर्यटक जखमी झाले. हे स्फोट बौद्ध भिक्षूंना लक्ष्य करून केले गेले होते.

हुंकार रॅलीत स्फोट –

नरेंद्र मोदींची ‘हुंकार रॅली’ 27 ऑक्टोबर 2013 रोजी पटणातील गांधी मैदानावर आयोजित करण्यात आली होती.  सहा वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेत गांधी मैदानाभोवती पाच स्फोट झाले. यानंतर रॅलीत चेंगराचेंगरी झाली. या रॅलीत जेव्हा स्फोट झाले तेव्हा नरेंद्र मोदी यांनी संयोजकांसह लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले होते.

Visit : Policenama.com