काय सांगता ! होय, ‘या’ नेत्याच्या मुलीनं केली बिहारमधील निवडणूक लढण्याची घोषणा, स्वतःला CM पदाचा उमेदवार म्हणून केलं जाहीर

पाटणा : वृत्तसंस्था – जेडीयूचे माजी आमदार आणि दरभंगाचे वरिष्ठ नेते विनोद चौधरी यांची मुलगी पुष्पम प्रिया चौधरी हिने बिहार विधानसभा लढण्याची घोषणा केली असून, तिने स्वतःला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केले आहे. राज्यातील हिंदी आणि इंग्रजी वर्तमान पत्रात जाहिरात देऊन या बाबतची माहिती तिने दिली आहे.

पक्षाचे नाव प्लुरल्स (PLURALS)  

लंडन स्थित वास्तवाला असलेल्या पुष्पम प्रिया चौधरी हिने (PLURALS) प्लुरल्स या नावाने पक्षाची स्थापना केली असून त्या स्वतः पक्षाच्या अध्यक्ष आहे. पुष्पम प्रिया हिने लंडन मध्ये स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पाॅलिटिकल सायन्स मधून मास्टर ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन केलं आहे.

पुष्पम चौधरी यांनी ट्विट करत बिहारच्या जनतेला आवाहन केलं की, बिहारच्या प्रगतीला वेगाची गरज आहे, बिहारला पंखांची गरज आहे, बिहारमध्ये बदल घडलाच पाहिजे कारण बिहारला आणखी प्रगती करण्याचा हक्क आहे. बिहारला २०२० मध्ये प्रगती पथावर नेण्यासाठी (PLURALS) प्लुरल्स पक्षाशी जोडावे असे सांगण्यात आले आहे.

पुष्पम प्रिया यांचे काका अजय चौधरी जेडीयू दरभंगा जिल्हाचे अध्यक्ष आहे. तसेच तिचे आजोबा दिवंगत उमाकांत चौधरी हे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे जवळचे मित्र राहिलेले आहे.