SSR Case : सुशांत सिंह राजपूतच्या संपत्तीबद्दल वडिलांनी सांगितला दावा, म्हणाले – ‘यावर फक्त माझा हक्क’

दिल्ली : वृत्तसंस्था – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर, आता त्याचे वडील केके सिंह यांनी सुशांतच्या संपत्तीवर त्यांचा हक्क असल्याचा दावा केला आहे. सुशांतच्या वडिलांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की कायद्याने मी सुशांतचा वारस आहे. त्यांनी सांगितले की सुशांतने त्याच्या आयुष्यात जे वकील, सीए ठेवले होते त्यांच्या सेवा घेतल्या होत्या, कायद्याने त्याचा वारस असल्यामुळे मी या सर्व सेवा सुशांतच्या मृत्यूनंतर बंद करत आहे.

केके सिंह यांनी सांगितले की, आता कोणताही वकील, सीए या कोणालाही सुशांतच्या संपत्तीला रिप्रेझेन्ट करण्याचा हक्क नाही राहणार. काही वकील मिडियासमोर आले होते त्यांनी सुशांत आणि त्यांच्यामध्ये झालेल्या बतचीतीचा खुलासा देखील केला होता. ते पुढे म्हणाले की, माझ्या अनुमतीशिवाय आता इथून पुढे सुशांतला रिप्रेझेन्ट करण्याचा हक्क असणार नाही.

प्रेस नोट मध्ये सुशांतच्या वडिलांनी लिहिलं आहे की, मी आणि माझ्या मुलींनी एसकेव्ही लॉ ऑफिसेज, कमर्शिअल, वरुण सिंह यांना वकील म्हणून नेमले आहे. सोबतच वकील विकास सिंह हे माझ्या परिवाराला रिप्रेझेन्ट करत आहेत. कोणी दुसरा व्यक्ती जो कुटुंबाचा दावा करत आहे त्याला माझी सहमती नाही.

बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला होता निर्णय

बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा निकाल दिला होता. कोर्टाने सांगितले की या प्रकरणाची चौकशी आता सीबीआय करणार. सुशांतची गर्लफ्रेंड रियाने पाटणा मध्ये दाखल केलेला एफआयआर मुंबईला शिफ्ट करण्यात यावा अशी याचिका दाखल केली होती. पण तिची ही मागणी फेटाळून लावण्यात आली आहे.

कुटुंबीयांनी मानले चाहत्यांचे आभार

सुशांतची भाची मल्लिका सिंह ने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ‘सुशांतचे चाहते, मीडिया, मित्र, परिवार यांचे मनापासून आभार. सुशांतबद्दलचे तुमचे प्रेम आणि आम्हाला दिलेली साथ याबद्दल आम्ही आभारी आहोत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे विशेष आभार’ असं तिने पोस्ट मध्ये लिहिलं आहे.