‘लॉलीपॉप लागेलू’पेक्षाही हिट आहे पवन सिंहचं ‘हे’ गाणं ! आतापर्यंत मिळालेत तब्बल 321 मिलियन Views (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन :भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार पवन सिंह याच्या एका गाण्यानं त्याला वर्ल्ड फेमस बनवणाऱ्या लॉलीपॉप लागेलू या गाण्याला मागे टाकलं आहे. सध्या व्हायरल होणाऱ्या त्याच्या गाण्याला युट्युबवर 321 मिलियन व्ह्युज मिळाले आहेत. खास बात अशी की त्याच्या या गाण्यात भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील अॅक्ट्रेस आम्रपाली दुबेदेखील आहे. भोजपुरी इंडस्ट्रीत दिनेश लाल यादव उर्फ निरुहआ आणि आम्रपाली दुबे यांची जोडी हिट झाली आहे. परंतु पवन सिंहच्या या गाण्यानं निरहुआ आणि आम्रपालीच्या हिट जोडीला खूप मागे टाकलं आहे.

पवन सिंहला जगात फेमस करणाऱ्या लॉलीपॉप लागेलू या गाण्याला पवनच्या या नव्या गाण्यानं मागे टाकलं आहे. लॉलीपॉप गाण्याला युट्युबवर अद्याप 12 कोटी लोकांनी पाहिलं आहे तर या नव्या गाण्याला मात्र 32 कोटी लोकांनी पाहिलं आहे.

पवन सिंह आणि आम्रपाली दुबे यांच्या सत्या सिनेमातील हे गाणं आहे. राते दिया बुता के असं या गाण्याचं नाव आहे. पवन सिंह आणि इंदु सोनालीनं हे गाणं गायलं आहे. सुमित सिंह चंद्रवंशीनं हे गाणं लिहिलं आहे. छोटे बाबनं या गाण्याला संगीत दिलं आहे. सध्या हे गाणं प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.