Pavana Dam | पवना धरणातून 3,500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – मागील काही दिवसांपासून पवना धरण (Pavana Dam) परिसरात मुसळधार पाऊस पडला आहे. मुसळधार पावसामुळ पिंपरी-चिंचवडकरांची (Pimpri-Chinchwad) तहान भागवणारे पवना धरण (Pavana Dam) जुलै महिन्यातच 85 टक्के भरले आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने पवना धरणातून आज (गुरुवार) दुपारी चार वाजल्यापासून विद्युत जनित्राद्वारे 1400 क्युसेक व साडव्याद्वारे 2100 क्युसेक असा एकूण 3500 क्युसेक विसर्ग (3500 cusec water release) सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

मागील काही दिवसांपासून मावळ (Maval) परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने मोठी वाढ झाली आहे. सध्या पवना धरण 85 टक्के भरले असून पावसाचा जोर कायम आहे. यामुळे धरणातील पाणी साठा लक्षात घेऊन धरणातून सहा दरवाजामधून 3,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

पनवा धराणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने धराणाच्या खालील बाजूस नदीकाठी असलेल्या सर्व गावातील नागरिकांनी सतर्क राहावे.
नदीकीनारी असलेली जनावरे, मोटारी, अवजारे व इतर सामुग्री सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना जलसंपदा विभागाने दिल्या आहेत.
जेणेकरुन कोणतीही जिवीत व वित्तहानी होणार नाही.

Web Title :- pavana dam overflow and 3500 cusec water release

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Modi | PM मोदींची मोठी घोषणा ! मराठीसह ‘या’ 5 भाषांमध्ये करता येणार इंजिनिअरिंग

Online Class | सावधान ! ‘ऑनलाइन क्लास’ मुलांसाठी अतिशय धोकादायक, शरीरासह मेंदूवर सुद्धा होतोय वाईट परिणाम, जाणून घ्या

Weather Update | आगामी 4 दिवस कोकण, पश्चिम महाराष्ट्र भागात मुसळधार पावसाचा इशारा