पवना धरण पन्नास टक्के भरले 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

संपूर्ण मावळासह पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मावळ तालुक्यातील पवना धरणात आज शुक्रवारी पन्नास टक्के भरले आहे. त्यामुळेशहरवासियांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

[amazon_link asins=’B012T2CRXY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e5776301-8667-11e8-8189-a3d010da16ab’]

मागील आठवडाभरापासून मावळ परिसरात पावसाचा जोर कायम आहे. मागील 24 तासात पवना धरण परिसरात 149 मिमी तर लोणावळा शहरात 80 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या संतधारेमुळे मावळ भागातील इंद्रायणी व पवना या दोन्ही नद्या दुथडी भरुन वाहत आहेत.मागील आठवड्यात सांगिसेपूल पाण्याखाली जाण्याची घटना व जलपर्णीमुळे इंद्रायणीला वाकसई भागात पूर आल्याच्या घटना घडल्या होत्या. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यासपुढील काही दिवसात मावळातील धरणे तुडुंब होण्याची शक्यता आहे. पावसाच्या सोबत वारा असल्याने लोणावळा व परिसरासह मावळात अनेक ठिकाणीविजेचा लपंडाव सुरु आहे.

गेल्या २४ तासात झालेला पाऊस  १४९ मि. मि. पाऊस पडला आहे. तर १ जूनपासून झालेला पाऊस १२९७ मि. मि., गेल्या २४ तासात पाणीसाठ्यात ३.७५ टक्केवाढ झाली आहे.