Pawan Kalyan | दाक्षिणात्य ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने मोडले वाहतुकीचे नियम

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Pawan Kalyan | गेल्या अनेक दिवसांपासून दक्षिणात्य चित्रपटाच्या अभिनेत्यांची क्रेझ ही जोरात चालू आहे. त्याचबरोबर दक्षिणात्य चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगलाच डंका वाजवत आहेत. दक्षिण भारतामध्ये सुपरस्टारचे चाहते त्यांना जणू काय देव मानतात. सुपरस्टारच्या चित्रपटाच्या रिलीज वेळी ते मोठमोठे बॅनर्स लावून चक्क त्यांचे दुधाने अभिषेक देखील करतात. दक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनेते चांगले नाव कमवून राजकारणामध्ये देखील प्रवेश केले आहेत. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे पवन कल्याण (Pawan Kalyan).

 

पवन कल्याण यांनी चित्रपट दुनियेत चांगले नाव लौकिक केल्यानंतर आपल्याच भावाच्या म्हणजेच चिरंजीवी (Chiranjeevi) यांच्या ‘प्रजा राजम पार्टी’ (Praja Rajyam Party) या पक्षामध्ये सहभाग घेत राजकारणामध्ये पदार्पण केले. यानंतर 2014 मध्ये पवन कल्याण यांनी स्वतःचा पक्ष ‘जन सेवा पार्टी’ (Janasena Party) ची स्थापना केली. आता पवन कल्याण चा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. पवन कल्याण (Pawan Kalyan) याची SUV कार वेगाने धावताना दिसत आहे आणि या गाडीच्या छतावर पवन कल्याण आणि त्याच्या आजूबाजूला त्याचे बॉडीगार्ड आणि अन्य साथीदार गाडीच्या दारावर लटकलेले दिसत आहेत. तर काही कार्यकर्ते गाड्या घेऊन शेजारी जाताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. गुंटूर जिल्ह्यामध्ये रस्ता रुंदीकरणाचा प्रकल्प सुरू आहे या प्रकल्पांना अंतर्गत येथील स्थानिक नागरिकांचे घरे पाडण्यात आले होते. अशाच या नागरिकांना भेट देण्यासाठी पवन कल्याण त्यांच्या साथीदारांसह जात असतानाचा हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

हा व्हिडिओ पाहून काहींनी यावर दमदार अशा प्रतिक्रिया देत पवन कल्याणच्या स्टाईलचे कौतुक केले आहे.
तर काहींनी यावर टीका देखील केली आहे. एका युजर रे “वाहतुकीचे नियम मोडले जात आहेत.
एवढेच नाही तर दुचाकी स्वारी हेल्मेट न घालताच जात आहेत आणि हा माणूस पुढारी बनणार आहे.
तर त्याच्याच या कमेंट वर एका युजरने असे देखील म्हटले आहे “यांच्या या अशा प्रभावामुळे आजची पिढी ही वाया जात आहे”.

 

Web Title :- Pawan Kalyan | telugu superstar pawan kalyans video has gone viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Abdul Sattar | वादग्रस्त वक्तव्यावरुन मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तारांचे टोचले कान, नेत्यांना दिले ‘हे’ आदेश

T20 World Cup | सेमी फायनलमध्ये पाऊस पडला ‘या’ प्रकारे जाहीर करण्यात येणार विजेता, आयसीसीचे नवीन नियम

Pune PMC News | पुणे मनपामध्ये करणार आणखी 200 हून अधिक पदांची भरती; आरोग्य आणि अग्निशामक दलामधील भरतीस प्राधान्य