Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा; क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी, नाशिक जिमखाना, ब्रिलीयन्ट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी संघांची विजयी कामगिरी !!

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – क्रिक् चॅलेंजर्स तर्फे आयोजित ‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद (Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament) १३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी आणि नाशिक जिमखाना संघांनी तिसरा तर, ब्रिलीयन्टस् स्पोर्टस् अ‍ॅकॅडमी संघाने प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. (Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament)

 

येवलेवाडी येथील बापूसाहेब शेलार क्रिकेट (ब्रिलीयन्ट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी) मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत समर परदेशी याच्या ८३ धावांच्या जोरावर नाशिक जिमखाना संघाने एमजीएम क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ७४ धावांनी पराभव करत दुसरा विजय मिळवला. तनिष जैन याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी संघाने एके स्पोर्ट्स संघाचा ७ गडी राखून पराभव करत विजयाची हॅट्रीक नोंदवली.

 

कर्णधार आर्य कुमावत याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर ब्रिलीयन्टस् स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीने एमजीएम क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ९ गडी राखून पराभव करत सलग दुसरा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना एमजीएम क्रिकेट अ‍ॅकॅडमीने ११३ धावा धावफलकावर लावल्या. यामध्ये आर्य कुमावत याने २० धावात ३ गडी बाद केले. शौर्य जाधव (नाबाद ४४ धावा) आणि आर्य कुमावत (३६ धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर ब्रिलीयन्टस् स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीने १६.१ षटकात व १ गडी गमावून लक्ष्य गाठले. सामन्यामध्ये दुसर्‍या गड्यासाठी आर्य आणि शौर्य यांनी ४३ चेंडूत ७८ धावांची भागिदारी रचली. (Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament)

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः

नाशिक जिमखानाः २५ षटकात ९ गडी बाद १९२ धावा (समर परदेशी ८३ (४१, १३ चौकार, २ षटकार), श्री बोंबाळे ३८, प्रणव पाटील १८, सोहम गिरी २-२८) वि.वि. एमजीएम क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २४.४ षटकात १० गडी बाद ११८ धावा (स्वरीत दरक ३६, मुफादल ताकसाळी १५, प्रणव पाटील ३-१७, गुरप्रीत सिंग २-२०, दिव्येश साळवे २-२२); सामनावीरः समर परदेशी;

 

Advt.

एमजीएम क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २५ षटकात ९ गडी बाद ११३ धावा (स्वरीत दरक ३७, सदगुरू रेड्डी १९, आर्य कुमावत ३-२०)
पराभूत वि. ब्रिलीयन्टस् स्पोर्टस् अ‍ॅकॅडमीः १६.१ षटकात १ गडी बाद ११५ धावा (शौर्य जाधव नाबाद ४४, आर्य कुमावत ३६, आर्यन देवधर १६);
(भागिदारीः आर्य आणि शौर्य ७८ (४३); सामनावीरः आर्य कुमावत;

 

एके स्पोर्ट्सः १५.१ षटकात १० गडी बाद ८२ धावा (आकाश एस. १६, प्रथमेश कुंभार १०,
तनिष जैन ४-१६, विवान देशमुख ३-२५) पराभूत वि. क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीः १
२.५ षटकात ३ गडी बाद ८३ धावा (सम्यक ओस्वाल १८, शौनक पंजाबी १८,
सार्थक शिंदे नाबाद १६, शादृल पांडे २-१७); सामनावीरः तनिष जैन;

 

Web Title :  Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘Pay Fair Trophy’ Championship Under 13 Boys Cricket
Tournament; Winning performance of Cricket Next Academy, Nashik Gymkhana, Brilliants Sports Academy teams !!

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा